IMPIMP

Atul Bhatkhalkar | ‘सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही’, भाजपची टीका

by nagesh
Maharashtra Political Crisis | bjp atul bhatkhalkar replied shiv sena chief uddhav thackeray over criticism on union minister home minister amit shah

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनशिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Shivsena Leader Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करत, अपात्रतेच्या संदर्भात तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत शिवसेनेला धक्का दिला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. भाजपचे (BJP) नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरे यांना पाहवत नाही, अशी टीका अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) म्हणाले, सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरे यांना पाहवत नाही. त्यांना आपणच मुख्यमंत्री असावे, हीच इच्छा होती. त्यासाठीच त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. यावरुन 2019 मध्येही त्यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, ही गोष्ट सिद्ध होत आहे. म्हणूनच त्यांनी जनादेश धुडकावला. महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका त्यांनी केली.

 

उद्धव ठाकरे बहुमत चाचणीला घाबरले
सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) बहुमत (Majority) चाचणी सामोरे जावे लागले,
असा आदेश दिल्यावर लगेचच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
यावरून ते बहुमत चाचणीला घाबरले. विधानसभेला सामोरे जायची त्यांना भीती वाटली. इतकेच नाही,
तर आपल्याकडे बहुमत नाही, हेही त्यांना माहिती होती. केवळ आणि केवळ मी आणि माझा मुलगा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री असला पाहिजे,
ही त्यांची जी भावना होती, असा आरोप आम्ही जो करत होतो, तोच आता सिद्ध होताना दिसतोय, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

 

Web Title :- Atul Bhatkhalkar | bjp atul bhatkhalkar criticized shiv sena chief uddhav thackeray over resign and political crisis

 

हे देखील वाचा :

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

New TDS Rules | आता इनफ्लुएन्सर्सला सुद्धा द्यावा लागेल टीडीएस! आजपासून लागू झाले नवीन नियम

Uddhav Thackeray On Eknath Shinde | ‘नवे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीत’; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

 

Related Posts