IMPIMP

Bachchu Kadu | ‘गुवाहाटीवरुन मला परत यायचे होते, पण…’ – बच्चू कडू यांनी मनातील खदखद केली व्यक्त

by nagesh
MLA Bachchu Kadu | bachu kadu warns if cabinet is not expanded eknath shinde devendra fadnavis govt will suffer

अमरावती : सरकारसत्ता ऑनलाईन   अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडात ते पहिल्या फळीतील आमदार होते. पण आता त्यांना मंत्रीपद न मिळाल्याने आणि त्यांच्याच गटातील आमदाराकडून पैसे खाल्याचे आरोप होत असल्याने नाराज आहेत. बच्चू कडू (Bachchu Kadu) शिंदे यांच्या गोटातून बंडाच्या पवित्र्यात आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बच्चू कडू यांनी आपल्या मनातील खदखद माध्यमांसमोर व्यक्त केली. गुवाहीटीत गेल्यानंतर 50 आमदारांकडे पाहण्याचा जनतेचा दृष्टीकोन बदलला. आम्ही काहीतरी वाईट करुन आलो, असे आम्हाला तिकडे वाटत होते. मी गुवाहाटीला जाऊ नये, असे बऱ्याच लोकांना वाटत होते. गुवाहाटीवरुन मला परत यायचे होते, पण आलेला माणूस परत जाऊ द्यायचा नाही, अशी ती वेळ होती. मुख्यमंत्री शिंदे हा मैदानावरचा कार्यकर्ता आहे. रात्री 2 वाजेपर्यंत वर्षा बंगल्यावर लोकांची वर्दळ असते. मी दिव्यांगांसाठी काम करतो. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे लोक आणि अधिकारी माझे काम करत नव्हते. गेल्या दीड वर्षांत त्यांनी दिव्यांगांसाठी एक बैठक देखील घेतली नाही.

 

उद्धव ठाकरेंबद्दल मला प्रेम आहे. पण ते मातोश्रीवर आणि वर्षावर वेगवेगळे होते. सत्तेत आल्यानंतर काही महत्वाची कामे होणे ही अपेक्षा होती. पण, ती झाली नाहीत. तेच मनाला खटकत होते. मी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेला (Shivsena) पाठिंबा दिला होता. रवी राणा (Ravi Rana) जे शब्द वापरत आहेत. पैसे घेतले, तोडपाणी करतो, मी गुवाहाटीला पैशासाठी गेलो नाही. मी कधीच पैशांसाठी काम केले नाही. माझे नाव घेऊन माझ्यावर आरोप केले या गोष्टी मला वेदना देणाऱ्या होत्या. राणांच्या मागे कोण आहेत, हे शोधणे महत्वाचे आहे. कोणीही पुराव्याशिवाय बोलू नये, असे कडू (Bachchu Kadu) म्हणाले.

 

मला पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल, असे वाटले होते. पण तसे झाले नाही.
सर्वच गोष्टींचे राजकारणात पालन होत नाही. मी शाळकरी विद्यार्थी असल्यापासून आंदोलन करतोय.
माझ्यावर 200 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असतील. कार्यकर्ते थकले आहेत. शेतकरी वेगवेगळ्या पक्षांत विभागला आहे.
त्यामुळे या सर्वांना पुढे नेण्यासाठी मंत्रीपद पाहिजे. मी 1 तारखेला काय करणार हे सांगू शकत नाही.
काही गोष्टींसाठी वाट पाहावी लागते. आरोप केले तर पुरावे दिले पाहिजेत. राणांवर कारवाई व्हावी, येवढा तो मोठा नाही.
माझ्यावर झालेल्या आरोपामुळे मी एकटा नाही, तर बंडातील सर्व 50 आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
यांच्यासह देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील अडचणीत आले आहेत, असे कडूंनी स्पष्ट केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bachchu Kadu | i wanted to come back from guwahati but bachhu kadu clearly stated

 

हे देखील वाचा :

Raigad News | रायगडचा स्वरूप शेळके अभियांत्रिकी पदवीका परीक्षेत राज्यात प्रथम; 99.70% गुण

Milind Narvekar | मिलिंद नार्वेकरांना ठाकरे गटाकडून धोका? सुरक्षेत वाढ

Bachchu Kadu | ‘आम्ही राजकारणात तडजोडी केल्याची किंमत भोगत आहोत’ – बच्चू कडू

BSNL चे जबरदस्त प्लान्स, कमी किमतीत लाँग व्हॅलिडिटीसह भरपूर डेटा आणि बरंच काही

 

 

Related Posts