IMPIMP

Pune Crime | दुर्दैवी ! नारायणगाव-शिरुर रस्त्यावर दुचाकी-ट्रेलरच्या धडकेत सख्ख्या भावांचा मृत्यू

by Team Deccan Express
Pune Crime | Unfortunately Two brothers killed in Narayangaon-Shirur road accident

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | ट्रेलर आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात (Two Wheeler Accident) दोन सख्ख्या भावांचा (Brothers) दुर्दैवी मृत्यू (Death) झाला तर एकजण जखमी झाला आहे. नारायणगाव – शिरुर रस्त्यावर (Narayangaon – Shirur Road) वळणवाडी – मांजरवाडी दरम्याने हा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरची धडक दोन भावांच्या दुचाकीला बसली. रामदास दशरथ केदारी Ramdas Dasharath Kedari (वय – 42), नारायण दशरथ केदारी Narayan Dasharath Kedari (वय – 40) असे मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. तर पोपट काळे (Popat Kale) हे जखमी झाले (Pune Crime) आहेत.

 

हा अपघात रविवारी (दि.15) सकाळी झाला. जखमी पोपट काळे यांच्यावर नारायणगाव रुग्णालयात (Narayangaon Hospital) उपचार सुरु आहेत. रामदास केदारी हे पुणे येथे रास्ता पेठेत (Rasta Peth) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत (MSEDCL) नोकरी करत होते. (Pune Crime)

 

मिळालेल्या माहितीनुसार,रामदास व नारायण हे आज सकाळी मांजरवाडी येथे बाजरीच्या काढणीसाठी जात होते.
त्यावेळी त्यांच्यासोबत पोपट काळे हे देखील होते.
नारायणगाव येथून ते दुचाकीवरुन (एमएच 14 एचएक्स 1460) मांजरवाडीच्या दिशेने जात होते.
त्यावेळी ट्रेलरची (एमएच 46 एआर 1211) धडक दुचाकीला बसली. यामध्ये केदारी भावंडांचा मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद नारायणगाव पोलीस ठाण्यात (Narayangaon Police Station) करण्यात आली असून पोलिसांनी ट्रेलर चालकाला ताब्यात घेतले आहे.

 

Web Title :- Pune Crime | Unfortunately Two brothers killed in Narayangaon-Shirur road accident

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Related Posts