IMPIMP

Bhagat Singh Koshyari | भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यानंतर कोण असू शकतात महाराष्ट्राचे संभाव्य राज्यपाल; समोर आली नावे

by nagesh
Bhagat Singh Koshyari| who is the new governor after the resignation of bhagat singh koshyari

मुंबई  : सरकारसत्ता ऑनलाईन  कायमच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) हे नेहमीच चर्चेत राहिले. अनेकदा विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. अखेर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीच केंद्र सरकारकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यात मात्र भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यानंतर पुढचे राज्यपाल कोण असतील याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. यात पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Capt. Amrindar Singh) यांचे नाव चर्चेत आहे. मात्र त्याबाबतची कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव चर्चेत असून आणखी एका नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते म्हणजे सुमित्रा महाजन (Sumitra Mahajan). या दोन्ही नावांची फक्त चर्चा सुरू असून त्याबाबतची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

 

महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली. त्यांनी महाराष्ट्रातील महापुरूषांबद्दल देखील वक्तव्ये केली. त्यामुळे राज्यात त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. तसेच राज्यपालांनी राजीनामा द्यावा, अशी देखील मागणी करण्यात आली. त्यानंतर आता भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या राजीनाम्याची इच्छा केंद्र सरकारकडे व्यक्त केली आहे. त्यासंबंधीचे पत्र देखील त्यांनी नुकतचं केंद्र सरकारकडे पाठविलं आहे. त्यावर आता काय निर्णय होतो. हे पाहावं लागणार आहे.

 

त्यानंतर पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव राज्यपाल पदासाठी चर्चेत आहे.
कॅप्टन अमरिंदर सिंग हे पंजाबचे माजी मुख्यमंत्री आहेत.
तसेच काही काळ ते पंजाबचे काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष देखील राहिले आहेत.
त्यांचे वडील हे पटियाला राजघराण्याचे शेवटचे राजे होते.
१९६३ ते १९६६ या काळात अमरिंदर सिंग यांनी भारतीय लष्करात देखील आपले योगदान दिले आहे.
पंजाबच्या २०१४ च्या निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर अमृतसर मतदारसंघातून निवडूण आले होते.
मात्र १८ सप्टेंबर २०२१ रोजी त्यांनी पक्षनेतृत्वाशी झालेल्या मतभेदामुळे आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर त्यांनी पंजाब लोक काँग्रेस अर्थात ‘पीएलसी’ (PLC) या पक्षाची स्थापना करून आपला पक्ष भाजपमध्ये (BJP) विलीन केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bhagat Singh Koshyari| who is the new governor after the resignation of bhagat singh koshyari

 

हे देखील वाचा :

Nagpur Crime | पीडित विद्यार्थिनी सहा महिन्यांची गर्भवती, प्रियकरावर बलात्काराचा गुन्हा दाखल

Building Collapse | भिवंडीमध्ये 2 मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना; 1 जणाचा मृत्यू

MP Sanjay Raut | ‘मविआत तणाव, मविआचा भाग व्हायचं असेल तर…’, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना सल्ला

 

Related Posts