IMPIMP

सीरमला टाकले मागे, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस 81 % परिणामकारक !

by sikandershaikh
Corona Vaccine | bharat biotech covaxin phase 3 data published in lancet 77 percent effective against symptomatic covid

सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online) कोरोनाची दुसरी लाट देशात आल्याचे निदर्शनास येताच मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सिरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन (bharat biotechs covaxin) लसीला आपत्कालीन वापराला मिळालेल्या परवानगीनुसार कोविशिल्ड लस महापालिका रुग्णालयांमध्ये तर कोव्हॅक्सिन लस जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध आहे. दरम्यान तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या निकालानुसार भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन ही लस ८१ टक्के परिणामकारक असल्याचे कंपनीने आणि आयसीएमआरने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे सीरमाच्या लसीलाही कोव्हॅक्सिनने मागे टाकले असून या लसीबाबतचा संभ्रम दूर होण्यास मदत मिळणार आहे.

मानवी चाचण्यांमध्ये कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन (bharat biotechs covaxin) या लसींची सुरक्षितता आणि परिणामकारकता सिध्द झाल्याने संभ्रम निर्माण होण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर दोनच दिवसांनी कोव्हॅक्सिनचे निकाल हाती आले आहेत.
सोमवारी १ मार्च पासून ज्येष्ठ नागरिक आणि व्याधीग्रस्त नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हॅक्सिन लस घेतली. पाठोपाठ शरद पवारांनीही लस घेतली मात्र त्यांनी कोविशिल्ड लस घेतली की कोव्हॅक्सिन यावरुन सोशल मीडियावर दिवसभर तर्क-वितर्क लढवले जात होते.

पंतप्रधानांनी स्वदेशी कोव्हॅक्सिन लस घेतल्याने महापालिका रुग्णालयांमध्येही अनेक ज्येष्ठ नागरिकांनी त्याच लसीची मागणी केल्याचे समजते.
सध्या कोविशिल्ड लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
दोन्ही लसी तितक्याच सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
भारत बायोटेक आणि आयसीएमआरने (ICMR) एकत्रितपणे कोव्हॅक्सिन ही लस विकसित केली होती.
तिसऱ्या टप्प्य़ात १८ ते ९८ वयाच्या २५ हजार ८०० लोकांवर चाचणी घेण्यात आली होती.
त्यामध्ये ही लस ६० टक्के परिणामकारक असेल असे भारत बायोटेकने गृहित धरले होते.
मात्र, आता समोर आलेल्या माहितीनुसार सध्याचा आकडा हा अपेक्षेपेक्षा जास्त आहे.
आपत्कालीन वापरावेळी कोव्हॅक्सिन लसीवरून वाद निर्माण झाला होता.
यामुळे लोकांकडून सीरमच्या कोविशिल्डला मागणी होऊ लागली होती.
भारत बायोटेकची ही लस ब्रिटनच्या नवीन कोरोना स्ट्रेनवरही प्रभावी ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.
दरम्यान, सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या AstraZeneca ची लस लस ७० टक्के परिणामकारक आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी शशिकला यांचा राजकारणातून ‘संन्यास’

Related Posts