IMPIMP

Bharati Sahakari Bank Case | हा सायबर हल्ला नाही, ग्राहकांचे आर्थिक नुकसान झालेले नाही; भारती सहकारी बँकेचा खुलासा

by sachinsitapure
Bharati Sahakari Bank Case | this is not a cyber attack there is no financial loss to customers disclosure of bharti sahakari bank

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Bharati Sahakari Bank Case | बँक खातेदारांची बनावट डेबिट कार्ड (क्लोन) करून सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) भारती सहकारी बँकेची एक कोटी आठ लाख 15 हजार 700 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर चोरट्यांनी एटीएम केंद्रातून बनावट डेबिट कार्डचा (Fake Debit Card) वापर करून खातेदारांचे पैसे चोरल्याचे निष्पन्न झाल्याचे वृत्त आल्यानंतर बँकेने याबाबत खुलासा केला आहे. भारती सहकारी बँकेतील (Bharati Sahakari Bank Case) कोणत्याही ग्राहकाचे आर्थिक नुकसान झालेले नाही. तसेच बँकेने या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध रितसर चौकशी करुन योग्य ती शिस्तभंगाची कारवाई केली आहे, असा खुलासा बँकेकडून करण्यात आला आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

डिसेंबर 2020 ते नोव्हेंबर 2021 या कोरोना महामारीच्या (Corona Epidemic) कालावधीमध्ये भारती सहकारी बँकेच्या (Bharati Sahakari Bank Case) विविध शाखांमधील एटीएम मधून दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांच्या बनवलेल्या बनावट 439 एटीएम कार्डचा (ATM Card) वापर करून 1247 एटीएम व्यवहार करण्यात आले आहेत. याद्वारे 1 कोटी 8 लाख 15 हजार 700 रुपये एवढ्या रकमेचा अपहार (Embezzlement) करण्यात आलेला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेने तातडीने 24 जुलै 2022 रोजी विश्रामबाग पोलीस चौकीत (Vishram Bagh Police Chowki) तक्रार दाखल केली आहे. तसेच 27 जुलै 2023 रोजी पोलीस चौकीमधील अधिकाऱ्यांनी FIR दाखल करुन घेतला आहे.

भारती सहकारी बँकेने याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank of India (RBI) 29 जुलै 2022 रोजी Fraud Monitoring Report सदर केलेला आहे. ऑगस्ट 2022 मध्ये आरबीआयने केलेल्या वार्षिक तपासणीमध्ये या घटनेची सविस्तर माहिती घेतली आहे. बँकेने या नुकसानीची तरतूद (Provision) केलेली आहे. भारती सहकारी बँकेतील कोणत्याही ग्राहकाचे आर्थिक नुकसान झालेले नाही. तसेच बँकेने या प्रकरणात निष्काळजीपणा दाखविलेल्या कर्मचाऱ्यांविरुद्ध रितसर चौकशी करुन योग्य ती शिस्तभंगाची कारवाई केली आहे, असे स्पष्टीकरण बँकेने दिले आहे.

हा सायबर हल्ला नाही

भारती सहकारी बँकेचा आर्थिक वर्ष 2022-23 अखेर एकूण व्यवसाय 2270.30 कोटी रुपये आहे.
बँकेचे निव्वळ एनपीए (NPA) चे प्रमाण 1.76 टक्के असून बँकेला 10.67 कोटी एवढा नफा झालेला आहे.
ही घटना Cyber Attack चा प्रकार नसून दुसऱ्या बँकेच्या ग्राहकांच्या बनवलेल्या बनावट एटीएम कार्डचा वापर करुन
भारती बँकेच्या विविध एटीएममधून पैसे काढून केलेला अपहार असल्याची माहिती बँकेचे
व्यवस्थापकीय संचालक सर्जेराव पाटील (Managing Director Sarjerao Patil) यांनी दिली आहे.

Web Title : Bharati Sahakari Bank Case | this is not a cyber attack there is no financial loss to
customers disclosure of bharti sahakari bank

हे देखील वाचा

Related Posts