IMPIMP

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची भाजपकडून मागणी

by pranjalishirish
bjp prasad lad demands home minister anil deshmukh resignation in sachin vaze case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे Sachin vaze यांच्यावर संशय व्यक्त केला जात होता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाईसाठी विरोधकांकडून दबाव वाढत आहे. यापूर्वी त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र, आता त्यांना निलंबित करण्यात आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख Anil Deshmukh  हे सचिन वाझेंना पाठीशी घालत आहे, असा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. त्यानंतर आता अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

विधिमंडळ अधिवेशनात मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यात पोलीस अधिकाऱ्यावर संशय असल्याने त्यांच्या निलंबनाची मागणी केली जात होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे  Sachin vaze यांना अटक आणि निलंबनाची मागणी लावून धरली होती. अखेर त्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर आता भाजपचे नेते आमदार प्रसाद लाड यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली. प्रसाद लाड यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले, की ‘सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावे बाहेर येत आहेत किंवा येतील आणि यातून झालेली मुंबई पोलिसांची नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे याची नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा.

गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे

सचिन वाझे Sachin vaze प्रकरणात रोज नवनवीन उलघडे होत आहेत. दोन डीसीपींची नावे बाहेर पडणार आहेत, असे ऐकण्यात येत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांची नाचक्की केली गेली. त्याचं कारण काय आहे. त्याला पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या, अशी विधान परिषदेत मागणी केली होती. गृहमंत्र्यांचा राजीनामा झालाच पाहिजे किंवा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला हवा, असे प्रसाद लाड म्हणाले.

Also Read : 

भिवंडी महापालिकेच्या सभागृह नेतेपदी का

Related Posts