IMPIMP

‘कोंढवा हे मिनी पाकिस्तान…’ या वक्तव्यामुळे मिलिंद एकबोटेंवर FIR दाखल

by bali123
Pune Crime | Milind Ekbote Nandkishore Ekbote granted pre-arrest bail but barred from entering Pune Municipal Corporation area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – ‘कोंढवा हे मिनी पाकिस्तान आहे. त्याच ठिकाणी हज हाऊस बांधण्यात येणार आहे. येथे अतिरेक्यांचा स्लीपर सेल आहे. यामुळे पुणेकरांचा जीव धोक्यात येऊ शकतो’, असे वक्तव्य समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटे ( milind ekbote ) यांनी केले होते. या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात मुस्लिम बहुल भाग म्हणून कोंढवाची ओळख आहे. या ठिकाणी हज हाऊस बांधण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेकडून घेण्यात आला. परंतु या हज हाऊसला मिलिंद एकबोटे यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे.

शिवप्रेमींनी एकबोटेंच्या आमिषाला बळी पडू नये…
मिलिंद एकबोटे यांच्याकडून दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण होतील असे वक्तव्य करण्यात आले आहे. यामुळे दंगल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिलिंद एकबोटे यांच्या विरुद्ध संभाजी ब्रिगेडच्या वतीने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. तमाम शिवप्रेमींना विनंती करतो की, एकबोटे यांच्या आमिषाला बळी न पडता शांतता राखावी, असे आवाहन संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले आहे.

समस्त हिंदू महानगरपालिकेचा मनसुबा यशस्वी होऊ देणार नाही
मिलिंद एकबोटे म्हणाले, कोंढव्यामध्ये हज हाऊस बनवण्याचे काम पुणे महानगरपालिकेकडून चालू करण्यात आले आहे. हे अतिशय आश्चर्यकारक आणि धक्कादायक आहे. पुणेकरांची सुरक्षा धोक्यात येईल, असा अतिशय घाणेरडा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे. महानगरपालिकेने जनतेच्या विकासासाठी जो पैसा खर्च होणे अपेक्षित आहे, तो पैसा हज हाऊसच्या बांधकामासाठी खर्च करायचा ठरवलेलं आहे. महापालिका प्रशासनाकडून हज हाऊससाठी चार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ॲमिनिटी स्पेसमध्ये सांस्कृतिक केंद्राच्या नावाखाली हज हाऊसचे बांधकाम करण्याची पळवाट आयुक्तांकडून शोधण्यात आली आहे, असे वक्तव्य मिलिंद एकबोटे यांनी केले आहे.

काय म्हणाले मिलिंद एकबोटे
प्रशासनाच्या मान्यतेशिवाय कोणत्याही धार्मिक स्थळाचे बांधकाम करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. यासाठी सांस्कृतिक केंद्र म्हणून मान्यता घेऊन महानगरपालिका प्रशासनाकडून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करण्यात आला आहे. समस्त हिंदू आघाडी आपली पूर्ण ताकद पणाला लावेल. पण महानगरपालिका प्रशासनाचा हज हाऊस निर्मितीचा मनसुबा हा समस्त हिंदू आघाडी कधीही यशस्वी होऊ देणार नाही.

– मिलिंद एकबोटे, समस्त हिंदू आघाडी

Related Posts