IMPIMP

Chandrakant Patil Birthday | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव (VIDEO)

पुण्यात दिग्गज मान्यवरांकडून अभिष्टचिंतन

by Team Deccan Express
Chandrakant Patil Birthday | Wishes showered on Guardian Minister Chandrakantada Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrakant Patil Birthday | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा १० जून रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला. पुणे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून नामदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. शुक्रवारी रात्री कोथरूड (Kothrud) मधील निवासस्थानी अनेक दिग्गज मान्यवरांनी नामदार पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तर शनिवारी सकाळपासून कार्यकर्त्यांकडून नामदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (Chandrakant Patil Birthday)

 

नामदार चंद्रकांतदादा पाटील दरवर्षी आपला वाढदिवस पाश्चात्य संस्कृतीला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी राखून साजरा करतात. यंदा त्यांनी आपला वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला होता. त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांनाही आवाहन केले होते की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा भेट वस्तू न देता, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या सेवेसाठी आर्थिक मदत करावी. (Chandrakant Patil Birthday)

 

 

नामदार पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भाजपाच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ही नामदार पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.

 

राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर (State Cooperative Council President Vidyadhar Anaskar), आमदार माधुरीताई मिसाळ (MLA Madhuri Misal), अश्विनी जगताप (Ashwini Jagtap), आमदार भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), आमदार रविंद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar), भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), धीरज घाटे (Dheeraj Ghate), राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), हेमंत रासने (Hemant Rasne), भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे (Rajesh Pande), सरचिटणीस मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik), पोलीस उपायुक्त सोहेल शर्मा (IPS Suhail Sharma), उद्योजक समीर पाटील (Entrepreneur Sameer Patil), राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradeep Garatkar), शहराध्यक्ष प्रशांत जगताप (NCP Prashant Jagtap), दीपक मानकर (Deepak Mankar), वाहतूक पोलीस आयुक्त विजयकुमार मगर (DCP Vijaykumar Magar) यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

तसेच आरोग्य सेवेसाठी मदतीचे धनादेश नामदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केले. या सर्वांचेही नामदार पाटील यांनी आभार मानले.
तसेच जनसेवेसाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही यानिमित्ताने दिली.

पालकमंत्री चद्रकांत पाटील यांनी वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ व भेटवस्तू न देता गरजू रुग्णांच्या उपचारासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार पाच लाख एक हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करताना उद्योजक समीर पाटील, स्मीता पाटील (Smita Sameer Patil),
अ‍ॅड. तनिशा पाटील (Adv Tanisha Patil), यावेळी अंजलीताई पाटील (Anjalitai Patil) उपस्थित होत्या.

 

Web Title :  Chandrakant Patil Birthday | Wishes showered on Guardian Minister Chandrakantada Patil

 

हे देखील वाचा :

Related Posts