IMPIMP

Chandrakant Patil Birthday | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ! पुण्यात दिग्गज मान्यवरांकडून अभिष्टचिंतन

Chandrakant Patil Birthday | Blessings on Guardian Minister Chandrakantada Patil! Abhishtchintan by eminent dignitaries in Pune
June 10, 2023

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा १० जून रोजी वाढदिवस (Chandrakant Patil Birthday) असून, पुणे जिल्ह्यातून सर्वच स्तरातून नामदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. शुक्रवारी रात्री कोथरूड (Kothrud Pune) मधील निवासस्थानी अनेक दिग्गज मान्यवरांनी नामदार पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या (Chandrakant Patil Birthday). तर शनिवारी सकाळपासून कार्यकर्त्यांकडून नामदार पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

 

नामदार चंद्रकांतदादा पाटील (Pune Guardian Minister Chandrakant Patil) दरवर्षी आपला वाढदिवस पाश्चात्य संस्कृतीला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी राखून साजरा करतात. यंदा त्यांनी आपला वाढदिवस आरोग्य सेवेसाठी समर्पित केला असून, कार्यकर्त्यांना ही वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा भेट वस्तू न देता, आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या सेवेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. (Chandrakant Patil Birthday)

 

 

नामदार पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी रात्री उशीरा उद्योजक समीर पाटील (Entrepreneur Sameer Patil) यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसह नामदार पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच नामदार पाटील यांच्या संकल्पाला अनुसरून आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले.

 

 

आज सकाळीही नामदार पाटील यांच्या कोथरूड आणि बाणेर (Baner) कार्यालयात कार्यकर्त्यांनी शुभेच्छांसाठी गर्दी केली होती.
कोथरूडमधील नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी नामदार पाटील यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. तसेच आरोग्य सेवेसाठी मदतीचे
धनादेश नामदार पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.

 

 

Web Title :  Chandrakant Patil Birthday | Blessings on Guardian Minister Chandrakantada Patil!
Abhishtchintan by eminent dignitaries in Pune

 

हे देखील वाचा :