IMPIMP

Chandrakant Patil | जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil reaction to jayant patil statement

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrakant Patil | काल एका वृत्तवाहिनीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या पहाटेच्या शपथविधी बाबत मोठा गौप्यस्फोट केला होता.
त्यावर आज (दि.२६) रोजी भाजपचे (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील
यांनी जयंत पाटील यांनी केलेला दावा फेटाळून लावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘जयंत पाटील यांनी जो गौप्यस्फोट केला आहे. हा त्यावेळी का केला गेला नाही. मुळात उशीरा सुचलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी असतात. त्यामुळे जयंत पाटील काय म्हणाले, कुणी काय म्हणालं, याला काही अर्थ राहत नाही.’ असं यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘देवेंद्र (Devendra Fadanvis) असे नेते झाले त्यांनी लहान वयात विश्वासार्हता मिळवली आहे. ज्या अर्थी देवेंद्र म्हणत आहेत, म्हणजे विश्वास ठेवला पाहिजे. देवेंद्र फडणवीस हे अलीकडे राज्यातील असे नेते झाले की लहान वयात त्यांनी विश्वास जपला ते माहिती नसताना काही बोलत नाहीत. माझ्या सारख्या लोकांनी त्यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी काहीतरी बोलतो आणि नंतर दिलगिरी व्यक्त करतो.’ असंही यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

यावर पुढे बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, ‘२०१४ मध्ये मी आणि धर्मेंद्र प्रधान
(Dharmendra Pradhan) होतो. पण जेव्हा युती तुटली तेव्हा माझा स्वभाव आहे की मला जेवढं सांगितले आहे
तेवढं मी काम करतो. राजकीय जीवनात सगळ्यांनी महत्वकांक्षी असावं पण पाय कापायचे नसतात.
काही जण होते पुण्यातले, की ज्याचे मुख्यमंत्रिपद फिक्स होतं पण ते उशिरा पोहचले.’
असा टोला त्यांनी नाव न घेता अजित पवार यांना लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारले असता, चंद्रकांत पाटील म्हणाले की जशी तुमच्या कानावर चर्चा आली,
तशीच माझ्याही आली. त्यामुळे तुम्हाला समजले तर मला पण कळवा. अशी मिश्किल टिपण्णी यावेळी
बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केली. शिवसेना (Shivsena) आणि वंचित (VBA) आघाडीची युती झाली आहे.
पण काळ ठरवेल की ते किती काळ एकत्र राहणार. एकत्र येणं आणि भ्रमनिरास होणं हा इतिहास आहे.
असेही यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | bjp leader chandrakant patil reaction to jayant patil statement

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत राष्ट्रवादीला मोठा धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात

Gopichand Padalkar | तहसीलदारांच्या कारवाईनंतरही गोपीचंद पडळकर म्हणतात, ‘ती जागा आमचीच; अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई…’

Republic Day | देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’

 

Related Posts