IMPIMP

Gopichand Padalkar | तहसीलदारांच्या कारवाईनंतरही गोपीचंद पडळकर म्हणतात, ‘ती जागा आमचीच; अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई…’

by nagesh
 Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar says the disputed land in miraj

मिरज : सरकारसत्ता ऑनलाईन  मिरज मधील वादग्रस्त जागा ताब्यात घेण्यासाठी रातोरात दुकाने पाडल्याप्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर
(Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रम्हानंद पडळकर (Bramhanand Padalkar) यांना तहसीलदार डी.एस. कुंभार (Tehsildar Miraj) यांनी
जोरदार धक्का दिला. सदर जागेवरील मिळकतधारकांचा कब्जा सिध्द करून पडळकर यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागावी, असा
आदेश तहसीलदार मिरज यांच्याकडून देण्यात आला. त्यानंतर आता पडळकरांनी (Gopichand Padalkar) यावर स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तहसीलदार मिरज यांनी दिलेला निकाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी अमान्य केला. तसेच हा निकाल माझे भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्या विरोधात वगैरे नसल्याचे गोपीचंद पडळकर म्हणाले. तालुका दंडाधिकारी यांनी दिलेला पूर्ण निकाल हा आमचे वकीलांनी पूर्ण वाचला असून निकालात माझे बंधू ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावावरील प्लॉटचा कब्जा तहसीलदार यांनी मान्य केला आहे. असे यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.

 

यावेळी बोलताना त्यांनी अतिक्रमण करणाऱ्यांना देखील इशारा दिला. गोपीचंद पडळकर म्हणाले, ‘आमच्या जागेत कोणीही अतिक्रमण करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करू. ज्या १७ मिळकतधारकांनी कब्जा मिळाल्याचे सांगितले आहे, त्यांचा आमच्या मिळकतीशी कोणताही संबंध नसल्याचे यावेळी बोलताना पडळकर म्हणाले. तहसीलदारांनी तसाच निर्णय दिला आहे. आणि ज्या जागेचा वाद आहे, ती सिटीसर्वेनुसार आपल्याच कब्ज्यात असल्याचेही तहसीलदारांच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले आहे. असे देखील यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले. तसेच ज्या मिळकतधारकांनी जागेचा कब्जा मिळाल्याचं सांगितलं आहे, त्यांचा सिटी सर्वे नंबर हा वेगळा आहे, आणि आपल्या जागेचा नंबर वेगळा आहे. असे देखील यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) म्हणाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ज्यांनी या प्रकरणात आमच्यावर खोटे आरोप केले त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार
असल्याचेही यावेळी बोलताना पडळकर म्हणाले.
जी आमची जागा आहे, ती ताब्यात घेण्यासाठी आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करू नये,
यासाठी पोलीस प्रमुख असतील किंवा संबंधित प्रशासन असेल यांच्याकडे मागणी देखील करणार असल्याचे
आमदार पडळकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले आहे.

 

 

Web Title :- Gopichand Padalkar | bjp mla gopichand padalkar says the disputed land in miraj

 

हे देखील वाचा :

Republic Day | देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पिंपरी चिंचवड अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘स्वतंत्रता जयंती पदक’

Sanjay Biyani Murder Case | नांदेडमधील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी हत्याकांड प्रकरणात NIA ला मोठे यश, प्रमुख शूटरला नेपाळ बॉर्डरवरुन अटक

Pathaan | … आव्हाड मुंब्र्याच्या कोणत्या बिळात लपून बसलेत?, ‘पठाण’ चित्रपटावरून मनसेचा हल्लाबोल

 

Related Posts