IMPIMP

Chandrakant Patil | कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची यादी तयार, लवकरच दिल्लीतून घोषणा – चंद्रकांत पाटील

by nagesh
 Pune Kasba Bypoll Election | kasaba peth assembly bypoll who will become congress candidate 16 name in race

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  कसबा आणि चिंचवड विधानसभेत पोटनिवडणूक (Maharashtra By-Election) होत असून याबाबत निवडणूक आयोगाने (Election Commission) तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र अद्याप भाजपकडून (BJP) उमेदवार जाहीर झाले नाहीत. यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना विचारले असता ते म्हणाले, कसबा (Kasba By-Election) आणि चिंचवड (Chinchwad By-Election) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची यादी तयार झाली आहे. ती यादी केंद्रीय समितीकडे (Central Committee) आम्ही शुक्रवारी (दि.27) पाठवणार आहोत. केंद्रीय समिती 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारी रोजी बैठक घेईल. त्यावेळी आमच्या यादीवर विचार केला जाईल. त्यानंतर दिल्लीतून 31 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीला उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाईल असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझ्या सारख्यांनी फडणवीसांकडून धडा घेतला पाहिजे

महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे (Former Mumbai CP Sanjay Pandey) यांना माझ्यावर गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Arrest) करण्याची सुपारी दिल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला आहे. यावर बोलताना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, राज्यात फडणवीस यांनी लहान वयात एक विश्वासार्हता निर्माण केली आहे. ते कोणत्याही विषयावर माहितीच्या आधारे बोलतात आणि त्यांना कधीही विधान मागे घ्यावे लागले नाही. माझ्या सारख्याने त्यांच्याकडून धडा शिकला पाहिजे. मी निरागसपणे काहीतरी बोलतो आणि माझं मोठं मन असल्याने दिलगिरीही व्यक्त करतो. त्यामुळे तुम्हाला फार काळ आंदोलन करण्याची मी संधी देत नाही. फडणवीस यांनी जे काही म्हटले त्यावर विश्वास ठेवला पाहिजे.

 

जयंत पाटलांना टोला

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीवर जयंत पाटील
(Jayant Patil) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी पहाटेचा शपथ विधी
केल्याचे जयंत पाटील म्हणाले होते. यावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, अशा प्रकारचे गौप्यस्फोट
त्या त्यावेळी का केले जात नाहीत. त्यामुळे उशिरा सुचलेल्या शहाणपणाला, उशिरा मिळालेल्या माहितीला काहीच
अर्थ नाही. संदर्भ नसलेल्या गोष्टी झालेल्या असतात. त्यामुळे याला काही अर्थ नसल्याचे सांगत त्यांनी
जयंत पाटील यांना टोला लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | chandrakant patil reaction on devendra fadanvis allegations against mahavikas aghadi

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Maharashtra Politics | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या बारामतीत राष्ट्रवादीला मोठा धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात

Gopichand Padalkar | तहसीलदारांच्या कारवाईनंतरही गोपीचंद पडळकर म्हणतात, ‘ती जागा आमचीच; अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई…’

 

Related Posts