IMPIMP

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील यांना पुन्हा शाई फेकण्याची धमकी, पुण्यात गुन्हा दाखल

by nagesh
 Chandrakant Patil | Inauguration of Rs 329 crore water supply schemes in Shirur taluka by Guardian Minister Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – भाजप नेते (BJP Leader) आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये शाईफेक (Throw Ink) करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना शाईफेकण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी (NCP) सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले (Vikas Lole) या फेसबुक अकाउंट धारकाने ही धमकी दिली आहे. याप्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत स्वप्नील बाबासाहेब बांगर Swapneel Babasaheb Bangar (वय-33 रा. कोथरुड) यांनी शुक्रवारी (दि.16) कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी विकास लोले अध्यक्ष-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया चिंचवड विधानसभा या नावाच्या अकाऊंट धारकावर आयपीसी 117, 153 (अ)-1(ब),500, 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे त्यांच्या मोबाईलमध्ये फेसबुक पाहत असताना त्यांना चंद्रकांत पाटील
(Chandrakant Patil) यांच्यबाबत एक पोस्ट आढळून आली.
ही पोस्ट राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष विकास लोले या फेसबुक अकाउंट धारकाने केली होती.
यामध्ये चंपा च तोंड काळे केले रे, आज पुन्हा शाईची मुक्त उधळण होणार?मु.पो. सांगवी, पत्रकार मित्रांनो आज
पण चांगला अँगल घ्या अशा आशयाची पोस्ट लिहिण्यात आली होती. संबंधित मजकूर असलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करुन दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | Chandrakant Patil threatened to throw ink again, case registered in Pune

 

हे देखील वाचा :

Shah Rukh Khan | ‘पठाण’ चित्रपटाच्या वादादरम्यान शाहरुख खानचा जुना व्हिडीओ व्हायरल; बॉयकॉटबाब केलं होतं भाष्य

Pune Crime | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन अ‍ॅसिड फेकण्याची धमकी, 42 वर्षीय आरोपी गजाआड; येरवडा परिसरातील घटना

Prashant Damle | ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाला फालतू आणि दर्जाहीन म्हणणाऱ्याला प्रशांत दामलेनी सुनावले खडेबोल

Malaika Arora | वय वाढत असल्याने मला ‘या’ गोष्टींची भीती वाटत आहे – मलायका अरोरा

 

Related Posts