IMPIMP

Chandrakant Patil | शिंदे गटातील काही आमदार नाराज असल्याची अजित पवारांची माहिती; तर जयंत पाटील म्हणाले सरकार टिकणे कठीण, चंद्रकांत पाटलांचे जोरदार प्रत्युत्तर

by nagesh
NCP Leader Ajit Pawar | ncp leader ajit pawar on chandrakant patil statement about mahatma phule babasaheb ambedkar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – Chandrakant Patil | शिंदे गटातील आमदार (Shinde Group MLA) नाराज आहेत. काही दिवसात खरं, खोटं काय ते समोर येईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटले आहे की, शिंदे गटातील सर्व आमदारांची मंत्रिपदाची मागणी आहे, त्यामुळे सरकार टिकणे कठिण आहे. या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याला भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले की, राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या (Shinde-Fadnavis Government) स्थापनेला 100 दिवस झाले आहेत. स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून अजित पवार आणि नाना पटोले (Nana Patole) याबाबत भाष्य करत आहेत. मात्र अजुनपर्यंत काहीही झालेले नाही.

 

अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला इशारा देताना म्हटले आहे की, सरकार येत असतात, जात असतात.
त्यामुळे मागच्या सरकारने दिलेला निधी रद्द करण्याचा पायंडा पडायला नको.
महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. भविष्यातील नवे सरकारही जुन्या सरकारकडे बोट दाखवत हा पायंडा कायम ठेवेल.
त्याची किंमत सर्वांनाच मोजावी लागेल.
पवार म्हणाले, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये महाविकास आघाडी सरकारने
(Maha Vikas Aghadi Government) दिलेला निधी रद्द करण्यात येत आहे.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | ncp leader ajit pawar said mla in shinde group is unhappy jayant patil and chandrakant patil replied

 

हे देखील वाचा :

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे गटाला दीपक केसरकरांचा इशारा; येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन…

Chandrakant Patil | सरकारमध्ये कुणीही नाराज नाही, जर कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत काढण्याची व्यवस्था सरकारकडे आहे – चंद्रकांत पाटील

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

 

Related Posts