IMPIMP

Deepak Kesarkar | उद्धव ठाकरे गटाला दीपक केसरकरांचा इशारा; येत्या दोन दिवसांत पत्रकार परिषद घेऊन…

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray blunt questions directly to deepak kesarkar in nagpur winter session

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन –  शिवसेना (शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे- Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) गट विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेना (Balasaheb’s Shivsena) असा कलगी-तुरा महाराष्ट्राच्या राजकारणात रंगला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासोबत महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी (NCP) देखील शिंदे आणि भाजप (BJP) सरकार आणि त्यांच्या आमदारांवर आगपाखड करत आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उद्धव ठाकरे यांना शिंदे गटाविरोधात दिल्या जाणाऱ्या घोषणांवर सुनावले आहे. ‘पन्नास खोके एकदम ओके’ म्हणणाऱ्यांना दोन दिवसांत कोण खोके घेतो, याचा खुलासा करणार आहे, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शुक्रवारी अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri By Election) शिंदे यांच्या गटाकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke)यांनी अर्ज दाखल केला, तर भाजप आणि शिंदे यांचे संयुक्त उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी देखील अर्ज दाखल केला. यावेळी दोन्ही गटांचे शक्तिप्रदर्शन झाले. शिवसेनेच्या ठाकरे गटाने ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावर दीपक केसकरांनी (Deepak Kesarkar) भाष्य केले. दादरच्या स्वामी नारायण मंदिरात ते दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमां सोबत संवाद साधला.

 

राज्यात ज्याप्रकारे आरोप आणि घोषणाबाजी केली जात आहे, ती योग्य नाही. ही महाराष्ट्राची आणि भारताची संस्कृती नाही.
शुक्रवारी आम्ही अंधेरी पोटनिवडणुकीचा (Andheri by-Election) अर्ज भरायला गेलो असताना, जे वर्तन केले, ते अतिशय दुर्दैवी होते. दिलीप लांडे (Dilip Lande) आणि शिंदे गटातील नेत्यांना खोकासूर, गद्दार म्हटले जाते. येत्या दोन दिवसांत मी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांना उत्तर देणार आहे. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला चांगले कोण आणि वाईट कोण हे कळेल. तसेच कोण खोके घेतात? हे सुद्धा कळेल, असे दीपक केसरकर म्हणाले.

 

 

Web Title :- Deepak Kesarkar | deepak kesarkar replied to thackeray group alligation on gaddar and khokasur

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | सरकारमध्ये कुणीही नाराज नाही, जर कोणी नाराज असेल तर त्यांची समजूत काढण्याची व्यवस्था सरकारकडे आहे – चंद्रकांत पाटील

Women Asia Cup 2022 | आशिया कप फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाने केला ‘हा’ पराक्रम

Prakash Ambedkar | अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाला पाठिंबा देण्याचा प्रश्नच नाही, प्रकाश आंबेडकर म्हणाले – ‘आमच्याकडे कोणीही…’

Womens Asia Cup | टीम इंडिया सातव्यांदा आशिया चषक जिंकणार कि श्रीलंका इतिहास रचनार?

 

Related Posts