IMPIMP

Chandrakant Patil | ‘आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार’ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

by nagesh
Chandrakant Patil | 'will give 25 crores for the first phase of Alandi development plan ' - Guardian Minister Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी सकाळी आळंदी (Alandi) येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला (Sant Dnyaneshwar Samadhi Mandir) भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील (Alandi Development Plan) पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. (Chandrakant Patil)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील (Vikas Dhage Patil), लक्ष्मीकांत देशमुख (Laxmikant Deshmukh), उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण (Sub-Divisional Officer Vikrant Chavan), नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव (Alandi CO Ankush Jadhav) आदी उपस्थित होते.

 

महसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे
नमूद करून पालकमंत्री पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, आळंदी देवस्थानच्या जमिनींवर
शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या.
महसूल मंत्री असतांना समितीच्या सदस्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी ४०० एकर जमीन देवस्थानला देण्याचा निर्णय घेतला.
या जागेच्या विकासासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यास पुणे महानगर विकास प्राधिकरणाची मान्यता घेण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल.

 

आराखड्यातील कामे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल.
पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी (व्हर्चुअल)
वारीसाठी २५ कोटींचा निधी देण्यात येईल. व्हर्चुअल वारीमुळे पंढरपूरला जाऊ न शकलेल्या वारकऱ्यांना
विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. संस्थानने त्याचे डिझाईन त्वरीत तयार करावे.
नगर परिषदेच्या माध्यमातून ही कामे करण्यात येतील.
पुढील टप्प्यात रुग्णालय व इतर कामांचादेखील समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

संत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीत येतात.
ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी जगणाऱ्या वारकऱ्यांची भेट होईल म्हणून आपण आळंदीत आल्याचे त्यांनी सांगितले.
जनतेची सेवा करण्यासोबत अशा देवस्थान परिसराचे प्रश्न सोडविण्याचे समाधान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

 

 

Web Title :- Chandrakant Patil | ‘will give 25 crores for the first phase of Alandi development plan ‘ – Guardian Minister Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Pune Crime | कोकण ट्रिपमधील ओळखीतून मुलाला मारुन टाकण्याची धमकी देऊन महिलेवर बलात्कार; टिंगरेनगरमधील महिलेची विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद

Chitra Wagh On Rahul And Tushar Gandhi | ‘राहुल गांधी आणि तुषार गांधी आपल्या पणजोबांच्या पुण्याईवर जगणारे दोन निरुपयोगी जीव’ – चित्रा वाघ

Uddhav Thackeray On Eknath Shinde Group | पुण्यातील ‘त्या’ घटनेवरून ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटाची अक्कलच काढली; ‘हे अकलेचे शत्रू शिवसेनेला हिंदुत्व आणि….’

 

Related Posts