IMPIMP

Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना! अडीच महिन्याचे बाळ 5 लाखात विकले

by nagesh
Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | baby was sold for 5 lakhs shocking incident in chhatrapati sambhaji nagar

छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन –  Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अडीच महिन्यांच्या बाळाला 5 लाख रुपयांना विकण्याचा डाव पोलिसांनी हाणून पाडला. एका महिलेने अडीच महिन्यांचे बाळ शहरातील एका अनाथालयाला विकले. तर अनाथालय चालक दाम्पत्याने त्या बाळाला 5 लाख रुपयांमध्ये विकायला काढले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच हा डाव पोलिसांनी हाणून पाडला आहे. याप्रकरणी बाळाला विकणारी आई, बाळाचा मामा अमोल मच्छिंद्र वाहुळ (Amol Machindra Wahul), अनाथालय चालक दिलीप श्रीहरी राऊत (Dilip Srihari Raut) व त्याची पत्नी सविता (Savita) यांच्यावर जवाहरनगर पोलिस ठाण्यात (Jawaharnagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक आम्रपाली तायडे (PI Amrapali Taide) यांना मंगळवारी सकाळी शिवशंकर कॉलनीतील जिजामाता बालक अनाथालयामध्ये एका बालकाची विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी तत्काळ पोलिस उपनिरीक्षक अनिता फसाटे (PSI Anita Fasate), ज्योती गात यांच्यासह सापळ्याचे नियोजन केले. सोबतच जवाहरनगरचे पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे (PI Venkatesh Kendre) यांना याबाबत कळवून सहायक पोलिस निरीक्षक दिलीप चंदन (ASI Dilip Chandan) यांचे पथक मदतीला घेतले.

पोलिस अनाथालयामध्ये दाखल होताच संपूर्ण संपूर्ण आश्रमाची पाहणी केली.
दरम्यान याचवेळी एका खोलीत झोळीत बाळ झोपलेले होते.
तसेच दिलीपची पत्नी सविता तेथेच बसलेली होती. पोलिसांनी दोघांची चौकशी सुरू केली.
पोलिसांना उत्तर देतांना,
दिलीपने पैठण तालुक्यातील दाभरूळ येथील सुनीता विलास साबळे (Sunita Vilas Sable)
हिने भावासह येऊन 14 जून रोजी दत्तक देण्यासाठी बाळ आम्हाला दिल्याचा दावा केला.
परंतु ते बाळ सुनीताचा असल्याचे कुठलेही पुरावा त्यांच्याकडे मिळून आले नाही.

Web Title : Chhatrapati Sambhaji Nagar Crime News | baby was sold for 5 lakhs shocking incident in chhatrapati sambhaji nagar

Related Posts