IMPIMP

Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्या ‘त्या’ विधानावर राष्ट्रवादीच्या आमदाराचा हल्लाबोल, तर सुप्रिया सुळेंचे मौन

by nagesh
Chitra Wagh | ncp mp supriya sule silence on bjp chitra wagh jyotiba phule statement in pune

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  भाजप (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी रविवारी पुण्यात झालेल्या कार्यक्रमात भाजपचे नेते आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची तुलना थेट महात्मा जोतिबा फुले (Mahatma Jotiba Phule) यांच्याशी केली. त्यामुळे राज्यात नव्या (Maharashtra Politics) वादाला तोंड फुटले आहे. चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awhad) यांनी समाचार घेत वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी मात्र यावर बोलणं टाळलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी केलेल्या विधानावर खासदार सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले असात त्यांनी मौन बाळगणे पसंत केले. तर दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत चित्रा वाघ यांच्यावर घणाघात केला आहे. ‘यांची डोकी फिरली आहेत, सत्ते चा माज, महात्मा जोतिबा फुले आणि थेट चंद्रकांत पाटील…’ असं ट्विट करत त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

 

काय म्हणाल्या चित्रा वाघ?
चित्रा वाघ म्हणाल्या, महिलांच्या जेवढ्या चळवळी झाल्या त्या सर्व चळवळींच महत्वाचं केंद्र पुणे आहे.
आजचीही नवीन सुरुवात येथून झाली आहे. आजच्या कार्यक्रमात देखील एका महिलेला पाच पुरूषांनी ओवाळं.
चंद्रकांत पाटील हे नेहमीच परिवर्तन घडवत असतात. आज देखील त्यांच्या माध्यमातून नवीन पायंडा पडला आहे.
त्यामुळेच मी नेहमी म्हणते, आम्हाला सावित्रीबाई (Savitribai Phule) घरोघरी दिसायला लागल्या आहेत.
मात्र चंद्रकांत पाटील आणि हेमंत रासने (Hemant Rasane) यांच्या सारख्या ज्योतिबांचा शोध जारी आहे.
असे जोतिबा समाजात जास्तीत जास्त तयार व्हाव्हेत याच आजच्या दिवसानिमित्त मी शुभेच्छा देईन असं चित्रा वाघ म्हणाल्या होत्या.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chitra Wagh | ncp mp supriya sule silence on bjp chitra wagh jyotiba phule statement in pune

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | ‘भीम आर्मी’ची भाजपनेत्या चित्रा वाघ यांना धमकी; म्हणाले…

Pune Crime News | विश्रामबाग परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या ‘सासु’चा छापा

Maharashtra Political Crisis | शिवसेना कुणाची? यावर आज निवडणुक आयोगापुढे महत्वाची सुनावणी

 

Related Posts