IMPIMP

Chitra Wagh On Sanjay Raut | ‘पंतप्रधानांवर बोलण्याची तुमची लायकी नाही’, संजय राऊतांच्या टीकेला चित्रा वाघ यांचे प्रत्युत्तर

by nagesh
Chitra Wagh On Sanjay Raut | BJP leader chitra wagh replied to sanjay raut criticism on narendra modi and amit shaha karnatak election 2023

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाईन – Chitra Wagh On Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी घाम आणि पैसा गाळून देखील कर्नाटकात भाजपचा दारुण पराभव होईल आणि हा 2024 या वर्षासाठी शुभशकुन असेल अशी टीका राऊतांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी हे देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळत असून त्यांच्यावर बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेतला. (Chitra Wagh On Sanjay Raut)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चित्रा वाघ यांनी ट्विट करुन संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. चित्रा वाघ म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, काश्मीरमधील कलम 370 (Article 370) हटवण्यासाठी, राम मंदिर (Ram Mandir) बनवण्यासाठी, देशभर चांगले रस्ते निर्माण करण्यासाठी, पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आणि परदेशात भारताचा लौकिक वाढवण्यासाठी घाम गाळला आहे. तर सर्वज्ञानी संजय राऊत यांनी पत्राचाळमध्ये भ्रष्टाचार (Patra Chawl Scam) करण्यासाठी, मराठी माणसाला लुटण्यासाठी, बेकायदा जमिनी खरेदी करण्यासाठी, कोविडमध्ये कंत्राट घेऊन कामावण्यासाठी, गैरमार्गानं आलेले 25 लाख भरण्यासाठी घाम गाळला आहे, हे सर्व देशवासियांना माहिती आहे, अशा शब्दात वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Chitra Wagh On Sanjay Raut)

 

पंतप्रधान मोदी गरिबांचं कल्याण करण्यासाठी आणि देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी घाम गाळत आहेत. त्यामुळे पंतप्रधानांवर बोलण्याची संजय राऊतांची लायकी नाही, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले.

 

 

काय म्हणाले संजय राऊत?

आज कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुका (Karnataka Assembly Elections) होत आहेत.
पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांनी घाम आणि पैसा गाळून देखील भाजपचा दारुण पराभव होत आहे.
हा 2024 साठी शुभशकुन आहे. दुःख इतकेच की महाराष्ट्राचे सध्याचे मिंधे राज्यकर्ते यांनी आपल्या सीमा भागात
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या (Maharashtra Ekikaran Samiti) पराभवासाठी कारस्थाने केली.
स्वतःला शिवसेना (Shivsena) म्हणवून घेणारे मुख्यमंत्री साहेबांनी मंगलोर मार्गे काही खोके बेळगावात
पाठवून एकीकरण समितीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी शर्थ केली. महाराष्ट्राशी ही गद्दारीच आहे.
मराठी माणूस हे लक्ष्यात ठेवील, असे संजय राऊत म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-   Chitra Wagh On Sanjay Raut | BJP leader chitra wagh replied to sanjay raut criticism on narendra modi and amit shaha karnatak election 2023

 

हे देखील वाचा :

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 16 हजाराच्या लाच प्रकरणी महिला कनिष्ठ सहाय्यकासह शिक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Chandrashekhar Bawankule On MVA | ‘मविआची वज्रमूठ सैल झाली, लवकरच…’, बावनकुळेंचे मोठं विधानं

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंनी दंगल भडकवण्याचं प्लॅनिंग केलं होतं, भाजप आमदाराचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

 

Related Posts