Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंनी दंगल भडकवण्याचं प्लॅनिंग केलं होतं, भाजप आमदाराचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊतांवर (MP Sanjay Raut) गंभीर आरोप केले आहेत. 1993 च्या दंगली (Riots) जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर (Matoshree) झालेल्या बैठकीत संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड (Charny Road) परिसरातील मुस्लिम फेरीवाल्यांवर हल्ला (Attack on Muslim Hawkers) करावा, त्यानंतर दंगली भडकवण्याची जबाबदारी माझी असेल असं या बैठकीत (Maharashtra Politics News) उद्धव ठाकरे म्हणाले होते. दंगलीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांचे होते असा मोठा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
नितेश राणे पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे सातत्याने दंगली भडकवण्याचा आरोप करत आहेत.
9 महिन्यापासून आमच्या सरकारवर असे आरोप करत आहेत. पण 13 ऑगस्ट 2004 रोजी मातोश्रीवर एक
बैठक झाली. त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी (Maharashtra Politics News) सांगितलं की 92,93 च्या दंगली
जशा घडल्या, तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे.
त्यावेळी ठाकरेंनी आदेश दिले होते की चर्नीरोड आणि दक्षिण मुंबईतल्या भागातले जे मुस्लीम फेरीवाले
आहेत त्यांच्यावर वस्तारा चालवत हल्ले करायचे. त्यानंतर मुंबईत दंगली घडतील.
त्या भडकवण्याची जबाबदारी माझी असेल असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होतोय यात उद्धव ठाकरे आणि टोळीचा हात आहे का याची
चौकशी गृहखात्याने केली पाहिजे. मालवणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेत उद्धव ठाकरे यांचा हात
आहे का याची देखील चौकशी करावी. 1999 पासून आजपर्यंत उद्धव ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न
पाहत आहेत. उद्धव ठाकरे हा किती कपटी आहे, हे मी तारखेसह आणि पुराव्यासकट बोलतोय.
राज्यात दंगल घडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरेंनाच धरले पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
Web Title :- Maharashtra Politics News | shivsena uddhav thackeray had planned to incite riots big claim of bjp mla nitesh rane
Comments are closed.