IMPIMP

Chandrashekhar Bawankule On MVA | ‘मविआची वज्रमूठ सैल झाली, लवकरच…’, बावनकुळेंचे मोठं विधानं

by nagesh
Chandrashekhar Bawankule On MVA | leader of mahavikas aghadi will join bjp Chandrashekhar bawankules statement

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule On MVA | मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी सामनामधून राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर या टीकेवरुन शरद पवारांनी संजय राऊतांना (Sanjay Raut) चांगलचं सुनावलं. या सर्व घडामोडीवर भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule On MVA) यांनी मोठं विधान केलं आहे. बानवकुळे यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीची वज्रमूठ (Vajramuth) सैल झाली आहे. लवकरच सगळे आमच्याकडे येणार आहेत. राज्यात पुन्हा एकदा आमची सत्ता येईल, असा दावा बावनकुळे यांनी केला आहे. तसेच कोर्टाच्या (Maharashtra Politics News) निकालापूर्वी जे सरकार कोसळणार असल्याचा दावा करत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी बावनकुळे यांनी यावेळी केली. (Chandrashekhar Bawankule On MVA)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाविकास आघाडीत अंतर्गत वाद

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
राष्ट्रवादीचे भाजपसोबत बोलणं सुरु असून ते आमच्यासोबत किती दिवस राहतील हे माहिती नाही असे
विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Congress Leader Prithviraj Chavan) यांनी केले होते.
यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी चव्हाण यांचे पक्षात स्थान काय असे विचारा असा टोला लगावला होता.
त्यावर लगेच नाना पटोले (Nana Patole) यांनी पवारांना प्रत्युत्तर दिले.
तर दुसरीकडे सामनामधून शरद पवारांवर टीका करण्यात आली.
त्यामुळे महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येत आहे.
याच पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे विधान केलं आहे.

 

 

Web Title :-  Chandrashekhar Bawankule On MVA | leader of mahavikas aghadi will join bjp Chandrashekhar bawankules statement

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics News | उद्धव ठाकरेंनी दंगल भडकवण्याचं प्लॅनिंग केलं होतं, भाजप आमदाराचा गंभीर आरोप (व्हिडिओ)

NCP MP Amol Kolhe Praised Ajit Pawar | अमोल कोल्हेंकडून अजित पवारांचे कौतुक; म्हणाले – ‘निवडणूक जिंकण्यासाठी अजित पवारांचा हात लागतोच…’

Pune Crime News | पुणे क्राईम न्यूज : लोणी काळभोर पोलिस स्टेशन – मी टिपू पठाणचा नंबरकारी ! तरूणावर चाकूने वार

 

Related Posts