IMPIMP

Chitra Wagh On Shiv Sena | ‘काल काही फुटले, आज 13 झाले, यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात’; चित्रा वाघ यांचा टोला

by nagesh
Chitra Wagh On Uddhav Thackeray | chitra wagh criticizes uddhav thackeray saying you are dragging a one and a half year old baby into politics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chitra Wagh On Shiv Sena | विधान परिषद निवडणुकीत (Maharashtra MLC Election) भाजपने (BJP) पुन्हा एकदा महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धक्का दिला आहे. भाजपचे पाच उमेदवार निवडून आले आहेत. तर आघाडी सरकारचे पाच उमेदवार निवडून आले असले तरी काँग्रेसच्या (Congress) एका उमेदवाराचा पराभव झाला आहे. आघाडी सरकारमधील मते फुटल्यानं हा धक्कातंत्र सहन करावा लागला आहे. तर दुसरीकडे कालपासून शिवसेनेचे जेष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गुजरातमध्ये आहे. ते 25 आमदारांसोबत असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. (Chitra Wagh On Shiv Sena)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,. “काल काही फुटले, आज 13 झाले. यालाच तीन तेरा वाजणे म्हणतात.” असं वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर “जय हो…विजय हो देवेंद्र फडणवीसजी” असं देखील त्यांनी आपल्या एका ट्विटमध्ये म्हटलं आहे. यासोबतच एक फोटो शेअर केला असून त्यामध्ये “पैलवान तेल लावून आले होते पण खेळ बुद्धिबळाचा होता” असं म्हटलं आहे. (Chitra Wagh On Shiv Sena)

 

 

 

दरम्यान, राज्यसभेनंतर विधान परिषद निवडणुकीतही भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. भाजपाचे पाचही उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले आहेत. पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपाकडे पुरेसं संख्याबळ नव्हतं. तरी देखील, भाजपाने विजय खेचून आणत सर्वांनाच धक्का दिला आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत नाराजीचा सूर दिसून आला आहे. त्यामध्येच, शिवसेना नेते एकनाथ शिंदे अचानक गुजरातला गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्षही आपला नियोजित कार्यक्रम सोडून रात्रीच सूरतला पोहचले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Chitra Wagh On Shiv Sena | bjp chitra wagh slams shivsena over vidhan parishad election and eknath shinde

 

हे देखील वाचा :

Karuna Sharma Arrested | पुणे पोलिसांकडून करूणा शर्मासह दोघांना मुंबईतून अटक

Pune Crime | कोंढव्यात ड्रेनेजच्या पाण्यावरुन वादात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

Eknath Shinde | नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट व्हायरल

 

Related Posts