IMPIMP

Eknath Shinde | नॉट रिचेबल झाल्यानंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदेंची पहिली फेसबुक पोस्ट व्हायरल

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde on question of cabinet expansion in maharashtra after delhi visit

सरकारसत्ता ऑनलाइन – Eknath Shinde | विधान परिषद निकालात ( Maharashtra Vidhan Parishad Election 2022) महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धक्कातंत्र सहन करावं लागलं आहे. यामध्ये भाजपची (BJP) खेळी यशस्वी झाली आहे. यातच आता राज्यात आणखी घडामोड घडताना दिसत आहे. विधान परिषद निकालानंतर आता शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे ते गुजरातमध्ये दाखल झालेत. ते नॉट रिचेबल आहेत. दरम्यान त्यांची फेसबुक पोस्ट (Facebook Post) व्हायरल होताना दिसत आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नॉट रिचेबल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पहिली फेसबुक पोस्ट केली आहे. “#योग म्हणजेच संतुलित मन, सुखी, निरोगी आणि समृद्ध जीवनाचा राजमार्ग आहे…”अशी पोस्ट त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केली आहे. काल संध्याकाळपासून एकनाथ शिंदे नॉट रिचेबल होते. काही आमदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधान परिषद निकालानंतर शिवसेनेमध्येच नाहीतर महाविकास आघाडी सरकार मधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.

 

 

महाविकास आघाडीलाच धक्का मिळण्याची शक्यता…

विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेची मतं फुटल्यानंतर आता शिवसेनेतच फुट पडतेय की, काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतले प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या आमदारांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे यांचा नाराज गट काल संध्याकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं कळतंय. या घडामोडींमुळे महाविकास आघाडीलाच धक्का मिळण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Eknath Shinde | eknath shinde facebook post

 

हे देखील वाचा :

Mahavikas Aghadi Government | महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता? एकनाथ शिंदे यांच्यासह 13 आमदार सुरतमध्ये; दुपारी भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता

Politics of Maharashtra | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड ! विधानपरिषदेच्या निकालानंतर आघाडी सरकारमधील अंतर्गत वाद वाढला; शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

Sangli Crime News | खळबळजनक ! सांगली जिल्यातील एकाच कुटुंबातील 9 जणांच्या आत्महत्या प्रकरणी 25 जणांवर गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

 

Related Posts