IMPIMP

CM Eknath Shinde | ‘सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल…’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde has criticized former cm uddhav thackeray for attending the opposition party meeting

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजपला (BJP) आव्हान देण्यासाठी एकजुटीने लढण्याचा निर्णय देशातील विरोधी पक्षांनी घेतला आहे. काल देशातील विरोधी पक्षांनी बिहारची राजधानी पाटणा येथे बैठकीचे (Opposition Meeting) आयोजन केले होते. या बैठकीला ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे उपस्थित होते. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेवर टीकास्त्र डागलं.

विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, मुख्यमंत्री असताना फक्त दोन वेळा मंत्रालयात गेलेले काल सत्तेच्या लालसेने थेट पाटण्याला पोहोचले. सत्तेसाठी आधीच हिंदुत्व (Hindutva) खुंटीला टांगले होते, काल पाटणा येथे जाऊन ते वेशीवर टांगले. केवळ आणि केवळ मोदींना विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या लोकांची आघाडी होणार नाही व झाली तरी या स्वार्थी आघाडीला लोक स्वीकारणार नाहीत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

 

https://twitter.com/mieknathshinde/status/1672500195089854465?s=20

सत्तेसाठी शिवसेना पक्ष (Shivsena), बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) विचार गहाण ठेवणाऱ्या
अशांच्या विरोधात आम्ही एक वर्षापूर्वी उठाव केला. कालच्या बैठकीमुळे आमची भूमिका किती योग्य होती हेच
पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेस (Congress), राजद (RJD), पीडीपी (PDP),
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP), जेडीयू (JDU) यांच्यावर कायम सडकून टीका केली होती, त्याच लोकांच्या टोळीत हे सामील झाले आहेत. याच लोकांनी हिंदुत्वाला, राम मंदिर (Ram Mandir) उभारणीला आणि कलम 370 रद्द करण्याला कडाडून विरोध केला होता, हे विसरून त्यांचेच उंबरे हे झिजवत आहेत. 370 कलमाचे (370 section) समर्थन करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांच्या शेजारी बसून एकोप्याच्या गप्पा करत आहे, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा द्वेष हा या सर्व विरोधकांचा एक कलमी कार्यक्रम आहे.
हिंमत असेल तर त्यांनी आघाडीचा नेता जाहीर करावा. पण तसे होणार नाही.
कारण प्रत्येकजण पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहात आहे. आत्मविश्वास गमावलेल्या या सर्व नेत्यांच्या चेहऱ्यावर नैराश्यच दिसत होते. मोदीजींचा पराभव करण्यासाठी 15 पक्ष एकत्र येत आहेत. हाच मोदीजींच्या कर्तृत्वाचा, नेतृत्वाचा विजय आहे. केवळ स्वार्थासाठी एकत्र आलेल्यांना 2024 च्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

कालच्या बैठकीत चारा घोटाळ्यात गजाआड गेलेल्या लालूप्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या मांडीला
मांडी लावून बसलेले लोक आता मुंबईतल्या भ्रष्टाचाराची आवई उठवून 1 जुलै रोजी मोर्चा काढणार आहेत.
त्यांना तो नैतिक अधिकार तरी आहे का?, असे म्हणत ठाकरे गटाच्या मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निशाणा साधला.

Web Title : CM Eknath Shinde | cm eknath shinde has criticized former cm uddhav thackeray for
attending the opposition party meeting

Related Posts