IMPIMP

ACB Trap News | 60 हजाराची लाच PhonePe व्दारे घेतल्याप्रकरणी मनपाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या स्वीय सहाय्यकासह एकाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल

by nagesh
ACB Trap News | A case has been registered by Anti-Corruption against one person along with the personal assistant of the Additional Commissioner of Municipal Corporation in connection with accepting a bribe of 60 thousand through PhonePe.

छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | 61 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती 60 हजार रूपयाची लाच PhonePe व्दारे घेतल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या (Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्तांचे स्वीय सहाय्यक आणि खाजगी इसमाविरूध्द अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला आहे. (ACB Trap News)

मनोज सुभाष मारवाडी Manoj Subhash Marwadi (45, पद – स्वीय सहाय्यक, अतिरिक्त आयुक्त, छत्रपती संभाजीनगर मनपा. रा. विवेकानंदनगर, प्लॉट नं. 3, टी.व्ही. सेंटर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेंद्र कदम Mahendra Kadam (30, रा. टी.व्ही. सेंटर, छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांनी दि. 31 मे 2023 रोजी लाचेची मागणी (Chhatrapati Sambhaji Nagar Bribe Case) करून दि. 1 जून 2023 रोजी फोन पे व्दारे लाच घेतली होती. (ACB Trap News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांनी त्यांचे जी 20 परिषदेकरीता शहरातील पूल, भिंती यांची रंगरंगोटी करण्याचे टेंडर भरून झोन 2, 3, 5 अंतर्गत कामे केली होती, त्याचे 1 कोटी 13 लाख रुपयांचे बिल काढण्याकरिता मनोज सुभाष मारवाडी यांनी 60,000 रुपये लाचेची मागणी केली (Chhatrapati Sambhaji Nagar ACB Trap News) व ती रक्कम मनोज सुभाष मारवाडी यांचे सांगणेप्रमाणे 60,000 रुपयाची रक्कम खाजगी इसम महेंद्र कदम याने ऑनलाइन फोनपे द्वारे स्वीकारली म्हणून तक्रारदार यांचे तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (Aurangabad ACB Trap)

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandeep Atole), अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक दिलीप साबळे (DySP Dilip Sable) , पोलिस नाईक जीवडे, पाठक, विलास चव्हाण आणि चालक चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. (Aurangabad Bribe Case)

Web Title : ACB Trap News | A case has been registered by Anti-Corruption against one person
along with the personal assistant of the Additional Commissioner of Municipal Corporation in
connection with accepting a bribe of 60 thousand through PhonePe.

Related Posts