IMPIMP

CM Eknath Shinde | घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना न्यायालयाने कालबाह्य केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

by nagesh
 CM Eknath Shinde | cm eknath shinde reaction on supreme court judgement on shivsena maharashtra political crisis news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर
आज निकाल जाहिर केला. न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
(Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले, अनेक लोक
घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटून घेत होते. सर्वोच्च न्यायालयाने या लोकांनाचा घटनाबाह्य केले, असा टोला
शिंदेंनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) पुढे म्हणाले, सत्याचा विजय झाला, लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. या देशात घटना आहे, कायदा आहे, नियम आहे त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही. हे मी नेहमी सांगतो. आम्ही जे सरकार स्थापन केले ते कायद्याच्या चौकटीत बसून केले. आज न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे, असे शिंदे म्हणाले. तसेच कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही सर्वांनीच स्वागत केले आहे. अपात्रतेचा अधिकार हा अध्यक्षांनाच आहे, त्यांच्याकडेच यावा अशी आमची मागणी होती, न्यायालयाने तेच केले असेही शिंदे यांनी म्हटले.

 

 

सर्वोच्च न्यायालयाने आज अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. कायद्याच्या आधारेच निवडणूक आयोगाने
(Election Commission) शिवसेना पक्ष (Shiv Sena Party) आणि पक्षचिन्ह (Party Symbol) हे आम्हाला
दिले आहे. उद्धव ठाकरेंना माहिती होतं की त्यांच्यामागे बहुमत नाही, मग राजीनामा दिल्याशिवाय त्यांच्याकडे
पर्याय नव्हता. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला, पण नंतर त्याला नैतिकतेचा मुलामा देण्याचा प्रयत्न केला.
नैतिकता आम्ही जपली, त्यांनी नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) विचारांची शिवसेना वाचवण्याचं काम हे आम्ही केलं, त्यांनी ते काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादीकडे (NCP) गहाण ठेवलं होतं,
अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde reaction on supreme court judgement on shivsena maharashtra political crisis news

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘…तेव्हा नैतिकता कुठे गेली होती’; राजीनाम्याच्या मागणीवर फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला (व्हिडिओ)

Pay Fair Cup Under-13 Cricket Tournament | ‘पे फेअर करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील मुलांची क्रिकेट स्पर्धा; नाशिक जिमखाना संघाचा दुहेरी विजय !!

Ganesh Nanasaheb Gaikwad | नानासाहेब गायकवाड आणि त्याचा मुलगा गणेश गायकवाड याची अमरावती कारागृहात रवानगी

 

Related Posts