IMPIMP

CM Eknath Shinde | ‘आता आपलं सरकार, शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही’ – एकनाथ शिंदे

by nagesh
CM Eknath Shinde | shiv sainiks will not have to face false cases if this happens cm eknath shinde warns

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनगेली अडीच वर्ष शिवसैनिक कसा राहिला, कसा वागला, त्याचं कसं चाललं याचा विचार कुणी केला. आता आपलं सरकार आहे. शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही. शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागू देणार नाही. शिवसैनिकांना (Shivsainik) खोट्या केसेसला सामोरं जावं लागणार नाही. जर असं काही उदाहरण तुमच्या नजरेस आले तर संबंधित अधिकारी त्या जागेवर राहणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गर्भित इशारा दिला आहे. आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी आयोजित केलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मध्यरात्री एकच्या सुमारास रवींद्र नाट्यमंदिरात (Ravindra Natya Mandir) कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले, सरकारमध्ये होतो, मुख्यमंत्री आपला होता तरीही अपेक्षेप्रमाणे कामं झाली नाहीत. निवडणुकीत चौथ्या नंबरवर शिवसेना गेली. ज्या सरकारमध्ये शिवसेना आहे त्यात शिवसैनिकांना काय मिळालं ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, सर्वसामान्य माणसांचे जीवन बदललं पाहिजे. हे सरकार माझं आहे हे सर्वांना वाटलं पाहिजे अशाप्रकारे काम आपल्याला करायचं आहे. शेवटी हे शिवसैनिक बाळासाहेबांचे सैनिक आहेत. बाळासाहेबांनी सांगायचं, दिघे साहेबांनी सांगायचे ते आम्ही करायचो. ही परंपरा जपणारे आम्ही आहोत. जे टिंगळटवाळ्या करतात त्यांना करु द्या असं शिंदे यांनी सांगितले.

 

संजय राऊतांना टोला

हे सरकार बेकायदेशीर आहे. शपथ घेतली तर घटनाबाह्य आहे असं सांगत बसलेत.
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) त्यांच्या मागण्या फेटाळून लावल्या घटनापीठ बसवून सुनावणी करणार आहे.
बाहेर येऊन विजय आपलाच झाला असा दिंडोरा पिटत आहेत.
आमच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे. घटनेनुसार कायद्याच्या बाहेर जाता येत नाही. आपलं सरकार स्थिर आहे.
165 मतांनी बहुमत चाचणी (Majority Test) पार केली आहे. त्यांचे 99 आहेत. आणखी पुढे बघा काय काय होतं.
आपल्याला राज्याला पुढे न्यायचे आहे. प्रगतीपथावर न्यायचं आहे.
या राज्याचा विकास करण्याचं ध्येय आपण समोर ठेऊन काम करतोय.
मध्यरात्रीचे दोन वाजले तरी कुणाच्या चेहऱ्यावर आळस नाही, उत्साह आहे.
सकाळी टीव्हीवर बघणाऱ्यांनी बघावं असा टोला एकनाथ शिंदे यांनी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना लगावला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | shiv sainiks will not have to face false cases if this happens cm eknath shinde warns

 

हे देखील वाचा :

Madras High Court | पत्नीने मंगळसूत्र काढणं ही सर्वोच्च पातळीवरील मानसिक क्रूरता; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Maharashtra Petrol-Diesel Price | दिलासा ! राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घट; जाणून घ्या आपल्या शहरांतील नवे दर

LIC Embedded Value | 5.41 लाख कोटी रुपये मोजण्यात आली एलआयसीची एम्बेडेड व्हॅल्यू

 

Related Posts