IMPIMP

CM Uddhav Thackeray | एसटी कर्मचार्‍यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले – ‘पैशांचं…’

by nagesh
CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray electric st bus shivai msrtc bus pune to ahmednagar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्ताने विद्युत प्रणालीवरील (ST Electrical Bus) बसेसचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. एसटी (ST) महामंडळाची विजेवर धावणाऱ्या पहिल्या वातानुकूलित ‘शिवाई’ बसचं उद्घाटन करण्यात आले. पुणे (Pune) ते अहमदनगर (Ahmednagar) मार्गावर ही बस धावणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी कोरोना (Corona) काळात केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावरुन अप्रत्यक्षपणे काही सल्ले देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी यावेळी दिले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असताना एसटीदेखील अमृत महोत्सवी (Amrit Mahotsav) वर्षात पदार्पण करीत आहे. मला जेव्हा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं समजलं तेव्हा विश्वासच बसला नाही. 1948 मध्ये एसटीची सुरुवात झाली. पुण्यातूनच सुरुवात झाली आणि आजही योगायोगाने पुण्यातूनच सुरुवात होत आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात त्यांना अपेक्षित ठिकाणी नेण्याचे कार्य एसटी गेली 75 वर्ष करीत आहे. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांचे (School Student) भविष्य घडविण्यातही एसटीचा वाटा असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

भविष्य घडवण्यात एसटीचा मोठा वाटा

पूर्वी वाहनं नव्हती, अनेकवेळा त्यांनी बैलगाडीतून (Bullock Cart) प्रवास केला. सर्वांना गाडी घेऊन प्रवास करणं जमत नाही. अशावेळी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल अशी सेवा देण्याचं मोठं काम एसटी करत आहे. भविष्य घडविण्यात एसटीचा मोठा वाटा आहे. राज्याचं, देशाचं भवितव्य देखील तुम्ही जपत आहात. कोरोना काळात एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) पराक्रम केला आहे. त्यांच्या ऋणातून आपण मुक्त होऊच शकत नाही. समोर धोका असताना त्यांनी काम केले. महाराष्ट्राच्या प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक दिवशी आणि जीवनाच्या प्रत्येक क्षणात एसटीचा सहभाग आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

नुकतंच आयपीएल (IPL) संपलं. त्यावेळी जाहिरातीदरम्यान मोठी स्वप्न पहा सांगत होते. अनेक खेळाडू त्यांना कोणी मदत केली सांगत होते हा जाहिरातीचा भाग होता. परंतु आजही एसटीमुळे कशी मदत झाली याबद्दल आणि आज मी जे काही आहे ते एसटीमुळे असं सांगणारे अनेक आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

… तर एसटी सेवेचा फायदा काय?

यावेळी बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची (ST Workers Strike) आठवण करुन देत तो काळ वेदनादायी होता असे सांगितले. गेल्या वर्षीचा तो काळ वेदनादायी होता. एसटीचे फक्त कर्मचारी म्हणून नाही तर कुटुंबाचे सदस्य म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. अनेकदा एसटी तोट्यात असल्याचं सांगितलं जातं. पण आपण जर खासगी बसेसच्या बरोबरीने तिकीट दर ठेवणार असू तर एसटी सेवेचा फायदा काय? त्यामुळे आपल्याला सहाजिकच तोटा सहन करावा लागतो. एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन शासनाकडून दिलं असून पुढील काही वर्षाचीही हमी घेतली असल्याचे, मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

पैशाचं सोंग आणता येत नाही

मधला काळ वेदनादायी होता कारण सर्व काही करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही.
तुमच्या व्यथा आमच्याकडे नाही मांडणार तर कोणाकडे मांडणार.
पण फक्त बरं वाटावं म्हणून न झेपणाऱ्या गोष्टी केल्या आणि उद्या शक्य नसल्या तर मग काय होणार?
त्यामुळेच आम्ही त्यावेळी जे शक्य आहे ते करु आणि यापुढेही करु.
पण आपण आपल्या राज्याचं वैभव आहोत याचं भान तुम्हीही ठेवलं पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

बदलत्या काळानुसार नव्या संकल्पनांचा स्वीकार

राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत सुधारणा करताना नव्या संकल्पना शासन स्वीकारत आहे.
सर्वात जास्त विद्युत बस आणणारे मुंबई हे देशातील पहिले शहर ठरले. विद्युत बसचे तंत्रज्ञान नवीन आहे,
त्याची सवय व्हायला वेळ लागेल. एसटीची सेवा प्रदूषण विरहीत कशी होईल याचे प्रयत्न करण्याची गरज आहे.
काळाच्या गरजा आणि तंत्रज्ञानात होत असलेले बदल लक्षात घेऊन त्यानुसार
प्रगती करणे हे आपले उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले.

 

Web Title :- CM Uddhav Thackeray | cm uddhav thackeray electric st bus shivai msrtc bus pune to ahmednagar

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut And Vasant More | पुण्यात संजय राऊत आणि वसंत मोरे यांच्यात भेट; ‘तात्यां’ च्या कामाचं केलं तोंडभरुन कौतुक !

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन लैंगिक अत्याचार; हडपसर पोलिसांकडून नराधमाला अटक

Aurangabad Crime | औरंगाबादमधील संतापजनक घटना ! कर्ज न फेडल्याने महिलेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल

 

Related Posts