IMPIMP

दिलासादायक ! कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा कहर संपला? ‘या’ तारखेनंतर प्रकरणांमध्ये होईल वेगाने घट

by omkar

सरकारसत्ता ऑनलाइन –

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना (Corona) महामारीच्या दुसर्‍या लाटेचा कहर वेगाने कमी होत चालला आहे. यामुळे अनेक राज्यांनी पुन्हा अनलॉकची प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे. देशात 50 दिवसानंतर कोरोनाची सर्वात जास्त प्रकरणे समोर आली आहेत.

मागील 24 तासात कोरोनाची 1.52 लाख प्रकरणे समोर आली आणि सुमारे 3,100 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दैनिक संसर्ग दर सुद्धा मागील सहा दिवसांपासून 10 टक्केच्या खाली कायम आहे आणि साप्ताहिक संसर्ग दर सुद्धा 10 टक्केच्या खाली आहे.

मात्र, कोरोना व्हायरसमुळे रोज होणार्‍या मृत्यूंची संख्या कमी होताना दिसत नाही आणि ती अजूनही तीन हजारपेक्षा जास्त कायम आहे. या दरम्यान प्रश्न असा आहे की, देशात कोरोनाची दुसरी लाट संपली आहे किंवा नाही.

Video : 6 वर्षाच्या चिमुकलीने विचारला पंतप्रधानांना जाब; म्हणाली…

सफदरजंग हॉस्पिटलमध्ये डिपार्टमेंट ऑफ कम्युनिटी मेडिसिनचे डायरेक्टर प्रोफेसर आणि हेड डॉ. जुगल किशोर यांनी म्हटले की, देशात कमी होणारी कोरोनाची प्रकरणे पाहता असे म्हणता येईल की, देशात कोरोनाची दुसरी लाट संपली आहे.

डब्ल्यूएचओच्या परिमाणाच्या आधारावर सुद्धा म्हटले जाऊ शकते की, ही लाट आता संपली आहे. परंतु आपल्यासाठी हे आव्हान असेल की, व्हायरस पुन्हा तेवढा प्रभावी होऊन परतू नये. यावर आपल्याला सातत्याने देखरेख करावी लागेल. हे सुद्धा पहावे लागेल की, व्हायरसचे स्वरूप बदलत तर नाही ना, एखादा नवीन व्हेरिएंट तर येत नाही ना.

एखादा नवा व्हेरिएंट दिसताच त्यास रोखण्यासाठी आपली सिस्टम अ‍ॅक्टिव्ह झाली पाहिजे. जर नवीन व्हेरिएंटच्या केस समोर आल्या तर ताबडतोब त्यांना आयसोलेट करावे, तसेच प्रयत्न केला पाहिजे की, जे लोक अशा लोकांच्या संपर्कात आले आहेत त्यांना सुद्धा तोबडतोब क्वारंटाइन केले जावे.

आजारावर लक्ष ठेवून ताबडतोब त्यांच्यावर उपचार करावेत. जेणेकरून तो लोकांमध्ये पसरू नये. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या तज्ज्ञांनुसार, जून महिन्यात नवीन कोरोन रूग्णांची संख्या पूर्णपणे कमी होईल, तसचे कोरोनाची दुसरी लाट सुद्धा संपेल.

कोविड संसर्गाच्या प्रतिबंधासाठी कामर करत असलेल्या आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे कोणतेही औषध नाही. परंतु मजबूत अंदाज आहे की, 20 जूननंतर किंवा या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात देशभरात कोरोनाची प्रकरणे पूर्णपणे थांबतील.

अनेक राज्यात संपला कहर

देशाच्या अनेक राज्यात कोरोनाची दुसरी लाट आता संपली आहे. दुसर्‍या लाटेचा पीक गेलेला आता 2 ते 3 आठवडे झाले आहेत.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली, गुजरात, छत्तीसगढ, झारखंड, दादरा आणि नगर हवेली, दमन आणि दीव, तेलंगना, हरियाणा, उत्तराखंड अणि गोवामध्ये नवीन केस 50 टक्केपेक्षा सुद्धा कमी येत आहेत. या राज्यांची स्थिती पहिल्यापेक्षा चांगली होताना दिसत आहे.

Also Read:- 

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’ ! लसीकरणावरून केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टाकडून खरडपट्टी?

किरीट सोमय्यां(Kirit Somaiya)नी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले…

Maratha Reservation : 3 पक्षांमध्ये मतभेद, मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचा आरक्षणाला विरोध; गिरीश महाजनांची टीका

Related Posts