IMPIMP

Conversion of Religion | धर्म परिवर्तन करणे, आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र मिळवण्याचा आधार नाही : मद्रास हायकोर्ट

by nagesh
Madras High Court | woman who separates from her husband on her own will then she will not get maintenance said madras high court

चेन्नई : वृत्तसंस्था मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) निर्णय सुनावताना म्हटले की, दुसर्‍या धर्मात परिवर्तन केल्यानंतर (Conversion of Religion) कोणत्याही व्यक्तीची जात बदलत नाही, ती अरूपांतरित राहते. या आधारावर, कोणतेही आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र (Inter Caste Marriage Certificate) जारी करता येऊ शकत नाही. (Conversion of Religion)

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

न्यायमूर्ती एस. एम. सुब्रमण्यम (Justice S. M. Subramaniam) यांनी मेत्तूर तालुक्यातील सलेम कॅम्पमधील रहिवासी एस. पॉल राज यांची एक रिट याचिका फेटाळत हा निर्णय सुनावला. याचिकेत म्हटले होते की, कोर्टाच्या आदेशाने आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र जारी व्हावे.

 

याचिकेत सलेम जिल्हा प्रशासनाचा 19 जून, 2015 चा एक आदेश रद्द करणे आणि याच्या परिणाम स्वरूप संबंधित अधिकार्‍यांना आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती.

 

आपल्या याचिकेत कोर्टाला सांगण्यात आले की, याचिकाकर्ता आदि-द्रविड समाजाचा होता. तो ईसाई धार्मात रूपांतरित होताच, त्यास 30 जुलै, 1985 ला समाजकल्याण विभागाच्या एका जीओनुसार मागसवर्गीय म्हणून वर्गीकृत करणारे एक सामुदायिक प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते. (Conversion of Religion)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

त्याने हिंदू अरुंथथियार समाजातील एका महिलेसोबत विवाह केला होता. कोर्टाला आढळले की, याचिकाकर्त्याच्या पत्नीला अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती (सुधारित) कायदा, 1976 च्या तरतुदीनुसार अनुसूचित जाती म्हणून सामुदायिक प्रमाणपत्र दिले गेले होते.

हे कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या दिनांक 28 डिसेंबर 1976 च्या एका GR वर अवलंबून होते.

याचिकाकर्त्याच्या पत्नीने सार्वजनिक रोजगारात प्राथमिकतेचा लाभ प्राप्त करण्यासाठी आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी एक अर्ज सादर केला होता.
2015 च्या आदेशात सलेम जिल्हा प्रशासनाने याचिका फेटाळली होती.
न्यायाधीशांनी म्हटले की, या प्रकरणात याचिकाकर्ता ईसाई आदि-द्रविड समाजाशी संबंधीत आहे,
जो एक अनुसूचित जाती समाज सुद्धा आहे आणि त्याच्या धर्मांतरानंतर, त्यास मागसवर्ग प्रमाणपत्र जारी करण्यात आले होते.

 

याचिकाकर्त्याच्या पत्नीने मान्य केले की, ती अनुसूचित जातीची आहे.
जेव्हा याचिकाकर्ता आणि त्याची पत्नी दोघे जन्माने अनुसूचित जातीच्या समाजाचेच आहेत,
केवळ यासाठी की धर्म परिवर्तनाच्या आधारावर त्यांना आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकत नाही.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

प्रकरण आंतरजातीय विवाह प्रमाणपत्र मिळवण्याचे होते, ज्याद्वारे सरकारी कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो.
न्यायाधीशांनी याचिका फेटाळत म्हटले की, पती आणि पत्नी दोघे एकाच समाजाचे आहेत,
या कारणामुळे त्यांना आंतरजातीय विवाह प्रमाणपत्राचा अधिकार नाही.

 

Web Title :- Conversion of Religion | conversion of religion is not a ground for getting inter caste marriage certificate madras high court

 

हे देखील वाचा :

Superfoods for Diabetes | डायबिटीजच्या रुग्णांनी आवश्य खाव्यात ‘या’ 6 गोष्टी, नियंत्रणात राहिल ब्लड शुगर

Pune Crime | महिला पोलिसाच्या नावाने बनावट सोशल मिडिया अकाऊंट; अश्लिल व्हिडिओ अपलोड करुन बदनामी

Gold Silver Price Today | खुशखबर ! सोन्याच्या दरात 1 हजाराची ‘घट’ तर चांदी देखील ‘घसरली’, जाणून घ्या आजचे दर

 

Related Posts