IMPIMP

Corona Cases In India Today | कोरोनाच्या नवीन प्रकरणात 6.7 टक्के वाढ, मागील 24 तासात 2 लाख 64 हजारपेक्षा जास्त केस

by nagesh
Corona Cases In India Today | coronavirus cases today india reports 2 64 202 fresh covid cases 6 7 higher than yesterday

नवी दिल्ली : वृत्त संस्थाCorona Cases In India Today | देशात जीवघेण्या कोरोना व्हायरस (Corona virus) महामारीचा वेग अनियंत्रित होत
आहे. सोबतच सर्वात धोकादायक व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron) ची प्रकरणे सुद्धा वेगाने वाढत आहेत. देशात मागील 24 तासात कोरोना व्हायरसच्या
2 लाख 64 हजार 202 नवीन केस समोर आल्या आहेत आणि 315 लोकांचा मृत्यू झाला. (Corona Cases In India Today)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

तर, आतापर्यंत कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची 5753 प्रकरणे समोर आली आहेत. देशात दैनिक पॉझिटिव्हिटी रेट आता 14.78% आहे. मोठी बाब ही आहे की, देशात आज 16 हजार 785 पेक्षा जास्त प्रकरणे आली आहेत, काल कोरोना व्हायरसची 2 लाख 47 हजार 417 प्रकरणे आली होती. आज देशात कोरोनाची ताजी स्थिती काय आहे जाणून घेवूयात…

 

 

अ‍ॅक्टिव्ह केस वाढून 12 लाख 72 हजार 73 झाल्या

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशात आता अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची संख्या वाढून 12 लाख 72 हजार 73 झाली आहे. तर, या महामारीने जीव गमावणार्‍यांची संख्या वाढून 4 लाख 85 हजार 350 झाली आहे. (Corona Cases In India Today)

आकड्यांनुसार, काल एक लाख 9 हजार 345 लोक बरे झाले, ज्यानंतर अजूनपर्यंत 3 कोटी 48 लाख 24 हजार 706 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

 

 

आतापर्यंत 155 कोटीपेक्षा जास्त डोस दिले

राष्ट्रव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत कोरोना व्हायरस विरोधी लसीचे 155 कोटीपेक्षा जास्त डोस दिले गेले आहेत. काल 73 लाख 8 हजार 669 डोस दिले गेले, ज्यानंतर आतापर्यंत व्हॅक्सीनचे 155 कोटी 39 लाख 81 हजार 819 डोस दिले गेले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

देशात आतापर्यंत ओमिक्रॉनच्या 5488 केस

देशात आतापर्यंत ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे 5 हजार 753 लोक संक्रमित झाले आहेत. सर्वात जास्त प्रकरणे महाराष्ट्र आणि दिल्लीत आहेत.

 

Web Title : Corona Cases In India Today | coronavirus cases today india reports 2 64 202 fresh covid cases 6 7 higher than yesterday

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

Maharashtra IPS Officer Transfer | भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra Police Transfer | राज्य पोलीस दलातील पोलीस अधीक्षक (SP) / उपायुक्तांच्या (DCP) बदल्या

 

Related Posts