IMPIMP

Coronavirus in India | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची मध्यावस्था; फेब्रुवारीत कळस गाठण्याची शक्यता

by nagesh
Pune Corona Update | 535 corona patients discharged in Pune city in last 24 hours find out other statistics

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Coronavirus in India | काही दिवसापासून कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वेगाने पसरत आहे. सरकारने कडक (Central Government) निर्बंध लागू केले आहेत. त्यातच इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी सचिव डॉ. रवी मलिक (Dr. Ravi Malik) यांनी महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (Coronavirus in India) मध्यावस्था सुरु आहे. संसर्गाचा वेग वाढत असला तरी फेब्रुवारी महिन्यात तिसरी लाट कळस गाठण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या इतर विषाणूंपेक्षा ओमायक्रॉन (Omicron Covid Variant) हा कमी घातक आहे. हा विषाणू श्वसनमार्गाला अधिक संसर्ग करतो. त्याची लक्षणे सौम्य असली तरी आपण योग्य ते उपचार करून घेतले पाहिजेत. भविष्यात ओमायक्रॉनमध्येही आणखी परिवर्तन होईल. आजवरचा इतिहास पाहिला तर कोणतीही साथ असली तरी तीन-चार लाटानंतर ती संपुष्टात येते असेही डॉ मलिक यांनी म्हंटले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

डॉ. रवि मलिक म्हणाले की, ‘संपूर्ण जगाला कोरोना संसर्गाविषयी रोज नवनवीन माहिती मिळत आहे. त्यामुळे कोरोनाचे आणखी नवे प्रकारही संसर्ग फैलावू शकतात. त्यामुळे ही लाट कधी संपुष्टात येईल हे आताच सांगणे कठीण आहे. (Coronavirus in India)

कोरोनाचा संसर्ग वेगाने (Corona Third Wave) पसरत आहे. लडाखमध्ये गेल्या 24 तासात 59 नवे रुग्ण सापडले.
त्यामुळे एकूण बाधितांची संख्या 22 हजारांवर पोहोचली आहे.
पुडुचेरीमध्ये आणखी 444 कोरोनाबाधित सापडले असून, रुग्णांचा आकडा 1 लाख 30 हजारांवर गेला आहे.
तर अरुणाचल प्रदेशमध्ये संसर्गदर 9.4 टक्के झाला आहे. दरम्यान, अमृतसर येथे विमानाने इटलीवरून काही लोक आले होते.
त्यांनी आम्ही कोरोनाबाधित नसून, चाचणी अहवाल चुकीचे आहेत असा आरोप केला.
त्याची एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (एएआय) गंभीरपणे दखल घेत याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
या चाचण्या एका खासगी प्रयोगशाळेतून करण्यात आल्या आहेत.

 

Web Title :- Coronavirus in India | corona third wave india begins climax will be reached february according medical experts Dr. Ravi Malik

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | आजही सोन्या-चांदीच्या भावात घसरण; जाणून घ्या लेटेस्ट आजचे दर

PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर

Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क

 

Related Posts