IMPIMP

PM Narendra Modi | पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील चुका काय होत्या?, धक्कादायक माहिती समोर

by nagesh
PM Narendra Modi | pm modi security breach in punjab govts report to centre bathinda ssp blames ferozepur VA

चंदीगड : वृत्तसंस्था PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 5 जानेवारी रोजी पंजाब दौऱ्यावर होते. त्यावेळी हुसैनीवाला (Hussainiwala) येथे जात असताना मार्गावर मोदी यांच्या वाहनांचा ताफा शेतक-यांनी आडवला अशी चर्चा आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सर्व कार्यक्रम रद्द करून पंतप्रधानांना दिल्ली परतावे लागले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केंद्राने (Central Government) पंजाब राज्य सरकारकडे (Punjab Government) अहवाल मागवला होता. यानंतर आता पंजाबच्या मुख्य सचिवांनी (Chief Secretary) गुरुवारी रात्री आपला अहवाल (Report) सादर केला असून त्यामध्ये सुरक्षेतील त्रुटींमागची कारणे देखील नमूद केली आहेत. या अहवालातून एक धक्कादायक बाब समोर आल्याचे समजते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दिेलेल्या अहवालानूसार, ‘फिरोजपूरच्या (Ferozepur) वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला. आपल्या अधिकारात त्यांनी
निदर्शकांना पंतप्रधान (PM Narendra Modi) ज्या मार्गावरून जाणार होते तिथे निदर्शने करू दिली’, असा गंभीर आरोप भटिंडाच्या (Bhatinda)
वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी (Senior Superintendent of Police) केल्याचा उल्लेख या अहवालात केला आहे. अशी माहिती सूत्रांकडून समजते. तर,
शेतकऱ्यांची निदर्शने अचानक झाली. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याची चौकशी सुरू आहे. त्याचवेळी पंतप्रधानांच्या सुरक्षेत कुठे चूक घडली? याची चौकशी करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली असल्याचा तपशील देखील यामध्ये नमुद केलं आहे. (PM Modi Security Breach)

 

दरम्यान, सुत्राकडून मिळालेल्या माहितीनूसार, फिरोजपूर येथे पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती त्या अधिकाऱ्यांशी बोलून पंजाब सरकारने हा अहवाल बनवल्याचंही म्हटलं जात आहे. तर, मोदी यांच्या दौऱ्याला संपूर्ण पंजाबमधून विरोध होता. ठिकठिकाणी निदर्शने केली जात होती. ती बाब ध्यानात घेत पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी अतिरिक्त पोलीस फौजफाटा (Additional Police Force) तैनात करण्यात आला होता, असं देखील पंजाब सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- PM Narendra Modi | pm modi security breach in punjab govts report to centre bathinda ssp blames ferozepur VA

 

हे देखील वाचा :

Bank Service Charges | जर ‘या’ बँकांमध्ये असेल तुमचे अकाऊंट, तर ‘या’ सेवांसाठी द्यावे लागेल जास्त शुल्क

Income Tax Refund | केवळ ITR भरण्याने येणार नाही रिफंड, ‘हे’ काम करणे सुद्धा आवश्यक

UPSC Success Story | कौतुकास्पद ! हमाल बनला IAS अधिकारी; रेल्वेचं ‘वायफाय’ घेऊन स्मार्टफोनवर केला अभ्यास

 

Related Posts