IMPIMP

Coronavirus in Maharashtra | अत्यंत चिंताजनक ! राज्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 26500 पेक्षा अधिक नवे रूग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

by nagesh
Coronavirus in Maharashtra | Extremely worrying! More than 26,500 new corona patients in the state in the last 24 hours, learn other statistics

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Coronavirus in Maharashtra | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Coronavirus) संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड व इतर महानगरामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधीतांची संख्या आढळून येत आहे. राज्यात वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे राज्याला चिंता लागली आहे. यातच आज (बुधवारी) (Coronavirus in Maharashtra) राज्यात 26 हजार 538 कोरोनाचे नवे रूग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 8 जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने विस्फोट केला असल्याचं दिसत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या नव्या ओमायक्राॅन विषाणूने (Omicron) धास्ती वाढवली आहे. आज राज्यात ओमायक्राॅनचे 144 रूग्ण आढळून आले आहेत. दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार (Maharashtra Government) देखील अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकार आज नवे निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. (Coronavirus in Maharashtra)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राज्यासह मुंबईत (Mumbai) देखील कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने मुंबईकरांची धास्ती देखील वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू केली आहे. दरम्यान, वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भामुळे राज्याची चिंता वाढली असल्याने आता राज्य सरकार काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.

गेल्या 24 तासात 5 हजार 331 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात कोरोनाचे 87 हजार 505 रूग्ण सक्रिय आहेत. ओमिक्रॉनचा आकडा 797 वर पोहचला असून त्यापैकी 330 जण बरे झाले आहेत.

 

Web Title :- Coronavirus in Maharashtra | Extremely worrying! More than 26,500 new corona patients in the state in the last 24 hours, learn other statistics

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रवींद्र बर्‍हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक

Maharashtra Rains | महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस कोसळणार? विकेंडला पावसाचा जोर वाढणार – IMD चा इशारा

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही कोरोनाचा संसर्ग

 

Related Posts