IMPIMP

Dasara Melava 2022 | शिंदे-ठाकरेंच्या व्यासपीठांवर पोस्टर वॉर, शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, शिंदे गटाच्या पोस्टरला ठाकरेंचंही जोरदार प्रत्युत्तर

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray to be in thane first time in eknath shinde home ground after shivsena crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या दसरा मेळाव्याला (Dasara Melava 2022) सुरुवात झाली आहे. यंदा शिवाजी पार्क (Shivaji Park) येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बीकेसी मैदानावर (BKC Ground) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असे दोन स्वतंत्र दसरा मेळावे (Dasara Melava 2022) होणार आहेत. त्यापूर्वी दोन्ही गटांच्या मंचासमोर लागलेले फ्लेक्स संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेत आहेत. माझ्या शिवसेनेला मी कधी काँग्रेस (Congress) होऊ देणार नाही, असा फ्लेक्स लावून शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याला ठाकरे गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिंदे गटाने व्यासपीठाच्या एका बाजुला उद्धव ठाकरे गटावर (Thackeray Group) टीका करणारे बाळासाहेब ठाकरेंच्या (Balasaheb Thackeray) एका भाषणातील वक्तव्य छापण्यात आले आहे. यामध्ये ‘मी माझ्या शिवसेनेला काँग्रेस होऊ देणार नाही’, असे लिहिले आहे. हे दुपारपासून चर्चेचा विषय असताना दुसरीकडे त्याला प्रत्यूत्तर म्हणून शिवसेनेने म्हणजेच ठाकरे गटाने व्यासपीठावर दुसऱ्या वक्तव्याचा बॅनर लावला आहे.

 

ठाकरे गटाने शिंदेंच्या काँग्रेसवरील पोस्टरला प्रत्युत्तर देण्यासाठी, ‘मी माझ्या शिवसेनेला भाजपाचा (BJP) गुलाम होऊ देणार नाही’, असे पोस्टर लावले आहे.
यामुळे दसरा मेळाव्यावरुन (Dasara Melava 2022) दोन्ही गटांमध्ये पोस्टर वॉर रंगल्याचे दिसून येत आहे.
काहीवेळातच दोन्ही गटांच्या प्रमुख नेत्यांची भाषणं होणार आहेत.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या शिंदेंनी अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीवर (NCP) नाराजी व्यक्त करुन बंड केले
ती राष्ट्रवादीच या साऱ्या पोस्ट वॉर पासून दूर राहिली आहे.

 

Web Title :- Dasara Melava 2022 | eknath shinde vs uddhav thackeray dasara melava shivsena shinde bkc thackerays shivajipark poster war on congress bjp

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | तुम्ही भाषण कोणाचं ऐकणार? अजित पवारांनी स्पष्टचं सांगितले…

Dhananjay Munde | शेवटी निवडणूक कोण जिंकणार हे मायबाप जनता ठरवत असते, धनंजय मुंडेंचे पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर

Dasara Melava 2022 | शिंदेंच्या दसरा मेळाव्यात मंचावर बाळासाहेबांची ‘ती’ खुर्ची, तर उद्धव ठाकरेंच्या मंचावर ‘या’ नेत्याला विशेष मान!

 

Related Posts