IMPIMP

Deepak Kesarkar-Shahaji Bapu Patil | शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे-मोदी हजार टक्के एकत्र येणार, राऊतांचे पीएमओला आवाहन

by sachinsitapure
Uddhav Thackeray-PM Narendra Modi

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Deepak Kesarkar-Shahaji Bapu Patil | लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections 2024) जवळ येऊ लागल्याने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. खोटे आरोप, दावे करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Narendra Modi) दिल्लीत भेटल्याचा दावा केला होता. आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनीही मोदी-ठाकरे एक हजार टक्के एकत्र येणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी पीएमओने खुलासा करण्याचे आवाहन शिवसेना ठाकरे गटाने केले आहे.

दीपक केसरकर यांनी म्हटले की, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. मात्र, उद्धव ठाकरे यांनी दोनवेळा दिलेला शब्द फिरवला आहे. त्यामुळे, आता त्यांना जवळ करायचे की नाही, हे पंतप्रधानांनी ठरवावे. यामुळे ठाकरे गटाच्या पुन्हा भाजपासोबत येण्याच्या हालचाली सुरु असल्याचे सिद्ध झाले आहे. शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपासोबत एनडीए आघाडीत आला तर राज्यातील राजकीय समीकरण बदलणार आहे, केसकरांनी म्हटले होते.

आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी सांगोला तालुक्यातील महुद येथे पत्रकारांशी बोलताना म्हटले की, एक हजार टक्के उद्धव ठाकरे आणि मोदीसाहेब एकत्र येणार आहेत. माझा अंदाज चुकणार नाही, दिवस कुठला आहे, हे बघा. हे व्हावच लागेल, याला कारण म्हणजे हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेऊन चालणार नाही. उद्धव ठाकरेंना मोदींकडे जावे लागेल यात कुठली शंका नाही, लवकरात लवकर हा दिवस येणार आहे.

दरम्यान, केसरकर आणि पाटील यांच्या दाव्याला उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, रश्मी ठाकरे – पंतप्रधान मोदींची भेट झाली असेल तर पीएमओ कार्यालयाने खुलासा करावा. केसरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दुसरे काही काम नाही. ते अस्वस्थ झालेत. ते भाजपाचे, मोदींचे गुलाम बनलेत. आम्ही कुणाला भेटलो नाही, असा खुलासा राऊतांनी केला.

Related Posts