IMPIMP

Deepika Padukone | दीपिका पादुकोण ‘या’ कारणाने पुन्हा एकदा आली चर्चेत; काय आहे नेमके प्रकरण?

by nagesh
Deepika Padukone | deepika padukone launches self care brand

सरकारसत्ता ऑनलाईन   टीम – बॉलीवूड (Bollywood) मध्ये आपल्या अभिनयाने मनामनात राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे दीपिका पादुकोण. दीपिकाने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याचबरोबर तिने आजपर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. दीपिका (Deepika Padukone) अनेक कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. आता दीपिका चर्चेत असल्याचे कारण म्हणजे तिने उभा केलेला नवीन बिजनेस (Launches Self Care Brand).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दीपिका पादुकोणला इंडस्ट्रीत येऊन पंधरा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच प्रसंगी तिने स्वतःचा सेल्फ केअर ब्रँड लॉन्च केला आहे. ज्याचे नाव ’82 East’ असे आहे. याची माहिती दीपिकाने (Deepika Padukone) सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करत दिली आहे. पोस्ट शेअर करत दीपिका ने असे म्हटले आहे की, “दोन वर्षांपूर्वी आम्ही एक आधुनिक सेल्फ केअर ब्रँड सुरू करण्याचा निर्णय घेतला ज्याचा उगम भारतातून होईल आणि संपूर्ण जगापर्यंत पोहोचेल”.

 

 

यापुढे ती असे म्हणाली, “आमचा ब्रँड स्टॅंडर्ड मेरिडियन पासून प्रेरित असल्याने ब्रँडचे नाव ’82 East’ असे ठेवण्यात आले.
दीपिकाचा हा पहिलाच व्यवसाय नाही. दीपिकाने याआधी स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती.
‘केए प्रॉडक्शन’ (KA Productions) असे त्या प्रोडक्शन हाऊसचे नाव होते. या प्रोडक्शन खाली ‘छपाक’ (Chhapaak) चित्रपट बनला होता.
दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास दीपिका शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathan) या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.
तर प्रभास (Prabhas) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सोबत देखील एका नव्या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्याचबरोबर ‘द इंटर्न’ (The Interns) च्या हिंदी रिमेक मध्ये ही दीपिका दिसणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Deepika Padukone | deepika padukone launches self care brand

 

हे देखील वाचा :

Nanded Crime | नंदिग्राम एक्सप्रेससमोर उडी घेत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, भोकर रेल्वे स्थानकाजवळील घटना

Pune Crime | जामिनदार मित्राला आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

Priyanka Chopra | अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ‘तो’ व्हिडिओ होतो आहे वायरल; म्हणाली ‘मला त्या ठिकाणी जायला…’

Rohit Pawar | “गोळीबार करणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि…”; रोहित पवारांकडून आव्हाडांची पाठराखण

 

Related Posts