IMPIMP

Pune Crime | जामिनदार मित्राला आत्महत्येस प्रवृत करणाऱ्या फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

by nagesh
une Crime News | The four who kidnapped and abducted the contractor were chased and imprisoned

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | बँकेकडून कर्ज घेऊन जामिनदार (Guarantor) राहिलेल्या मित्राला मानसिक त्रास देऊन त्याला आत्महत्येस (Suicide) प्रवृत्त करणाऱ्या फरार आरोपी कर्जदाराला गुन्हे शाखेच्या युनिट एकने (Crime Branch Unit-1) बेड्या (Pune Crime) ठोकल्या आहेत. किरण भातलांवडे Kiran Bhatlawde (रा. मांजीर बुद्रुक) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर राजेंद्र उर्फ राजू रामचंद्र राऊत Rajendra alias Raju Ramchandra Raut (रा. घोरपडे पेठ, पुणे) असे आत्महत्या केलेल्या जामिनदार मित्राचे नाव आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत राजेंद्र राऊत यांची मुलगी वैष्णवी राऊत (Vaishnavi Raut) हिने समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपी किरण भातलांवडे याच्याविरुद्ध आयपीसी 306 प्रमाणे गुन्हा (FIR) दाखल केला. तसेच समन्स बजावणी करणाऱ्या दोन अंमलदारावर देखील गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी किरण भातलांवडे हा फरार झाला होता. (Pune Crime)

 

किरण भातलांवडे याने बँकेकडून गाडीसाठी कर्ज घेण्यासाठी राजेंद्र राऊत यांना जामिनदार करुन घेतले. मात्र, कर्ज घेतल्यानंतर कर्जाचे हप्ते भरले नसल्याने बँकेने राऊत यांना नोटीस पाठवली. तसचे त्यांच्याविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला. या खटल्याची समन्स (Summons) बजावणी पोलीस अंमलदार करत होते. वारंवार कोर्टाचे समन्स घेऊन पोलीस येत असल्याने आणि कर्जदार मित्र बँकेत पैसे भरत नसल्याने राऊत हे तणावात होते. याचा मानसिक त्रास होऊन त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली.

 

किरण भातलांवडे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता.
आरोपी आपले अस्थित्व लपवून राहत असून तो मांजरी बुद्रुक येथील एच.पी. पेट्रोलपंप येथे मित्राला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती युनिट एकच्या पोलीस अंमलदार यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी आरोपीला समर्थ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले (Senior Police Inspector Sandeep Bhosle),
सहायक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर (API Ashish Kavathekar), पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी (PSI Sunil Kulkarni),
पोलीस अंमलदार निलेश साबळे, शुभम देसाई, महेश बामगुडे यांनी केली.

 

Web Title :- Pune Crime | The absconding accused who incited the friend of the bailiff to commit suicide was arrested by the crime branch

 

 

हे देखील वाचा :

Supriya Sule | जितेंद्र आव्हाड यांना झालेल्या अटकेचा मला अभिमान आहे – सुप्रिया सुळे

Pune Crime | नविन मिटर घेऊन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, काही तासातच आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात

Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड यांनी नेमका कोणता गुन्हा केला आहे?, जयंत पाटलांचा सवाल

Kailash Gorantyal | अब्दुल सत्तार मतिमंद आहेत, त्याला मतिमंदांच्या शाळेत पाठवा – कैलास गोरंट्याल

 

Related Posts