IMPIMP

Delhi Police Action In Mumbai | दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई! मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर 1800 कोटींचे हेरॉईन जप्त

by nagesh
 Delhi Police Action In Mumbai | 20 tonnes worth of 1800 crores heroin seized at nhavasheva port in mumbai delhi police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Delhi Police Action In Mumbai | दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) मुंबईमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर (Nhavasheva port) 20 टनपेक्षा जास्त हेरॉईन (Heroin) जप्त करण्यात आले आहे. आतापर्यंतची हि सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या जप्त केलेल्या हेरॉईनची किंमत जवळपास 1800 कोटी रुपये आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी अफगाणी आरोपींना ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी मुंबईतील बंदरावर अजून काही कंटेनर असल्याची माहिती पोलिसांना दिली. (Delhi Police Action In Mumbai)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यानंतर दिल्ली पोलिसांनी या माहितीच्या आधारे एक विशेष पथक मुंबईला पाठवले. या पथकाने धडक कारवाई करत मुंबईच्या न्हावाशेवा बंदरावरून 1800 कोटींचे हेरॉईन जप्त केले. याच महिन्यात दिल्ली पोलिसांनी कालिंदी कुंज (Kalindi Kunj) परिसरातून दोन अफगाणी आरोपींना ताब्यात घेतले होते. त्या आरोपींची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी ग्रेटर नोएडा (Greater Noida) आणि लखनौमधून (Lucknow) 1200 कोटींचे ड्रग्ज (Drugs) जप्त केले होते. (Delhi Police Action In Mumbai)

 

या जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत 1725 कोटी रुपये आहे.
याच आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईतील न्हावाशेवा बंदरावर कंटेनरमधून 1800 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.
हे ड्रग्ज दुबई येथून आले असल्याची माहिती समोर आली आहे.
या ड्रग्सच्या विक्रीमधून मिळणारा पैसा पाकिस्तानातील आयएसआय एजन्सीला (ISI Agency) जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Delhi Police Action In Mumbai | 20 tonnes worth of 1800 crores heroin seized at nhavasheva port in mumbai delhi police

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | शिंदे-फडणवीस 3 तासांनंतरही कार्यक्रमाला न आल्याने अजितदादा निघून गेले; आयोजकांना झापले, म्हणाले…

CBI ACB Trap | 1 लाखाची लाच घेताना पुण्यातील दूरसंचार विभागातील दोन बडे अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात

Adv.Pravin Chavan | अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द

 

Related Posts