IMPIMP

Devendra Fadnavis | “…तर मग द्याना केंद्राच्या हातात सरकार, तुम्ही काय वसुलीला बसला आहात का?”- देवेंद्र फडणवीस आक्रमक!

by nagesh
Devendra Fadnavis | hingoli farmer dashrath mule police complaint against dy cm devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) राज्य सरकारवर (Maharashtra State Government) निशाणा साधला आहे. मुंबईमधील (Mumbai) वसंत स्मृती या सभागृहामध्ये भाजप ओबीसी मोर्चाच्या मेळाव्यात बोलताना, राज्य सरकारने (State Government) ओबीसी आरक्षणाची ठरवून कत्तल केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सत्तेमध्ये आल्यापासून त्यांना इम्पिरिकल डाटा (Imperial Data) गोळा करता आला नाही. कोर्टानं वारंवार अनेकदा झापूनही त्यांच्यातील एकजण उठतो आणि केंद्राची जबाबदारी असल्याचं सांगत सुटतो. अरे मग तुम्ही सरकारमध्ये कशाला आहात?, द्या ना मग केंद्राच्या हातात. केंद्र सरकार (Central Government) चालवेल आणि करूनही दाखवेल, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सरकारवर निशाणा साधला.

 

तुम्हाला काय माशा मारण्यासाठी निवडून दिलं आहे का?, माल कमावण्यासाठी की वसुलीसाठी जनतेनं तुम्हाला निवडून दिलंय?,
असा सवाल करत देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला धारेवर धरलं.
भाजपचा डीएनए (DNA) ओबीसी असून याच समाजाच्या जीवावर मोठा झालेला पक्ष असल्याचंही फडणवीस म्हणाले.

 

दरम्यान, ओबीसी आरक्षण असलं किंवा नसलं तरी भाजप 27 टक्के जागांवर
ओबीसी उमेदवार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणाचा विषय चिघळल्याचंही फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis allegation on maha vikas aghadi thackeray govt maharashtra on obc reservation

 

हे देखील वाचा :

ICAR Recruitment | ICAR भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये 462 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, असा करा अर्ज

Ajit Pawar | प्रांत अधिकारी 2% कमिशन घेतात, शेतकऱ्याच्या तक्रारीनंतर अजित पवारांनी कपाळाला लावला हात अन्…

MBBS Students News | MBBS च्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

 

Related Posts