IMPIMP

Devendra Fadnavis | कोणत्याही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis first reaction on the kolhapur incident

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – कोल्हापुरात काल सोशल मीडियातून आक्षेपार्ह स्टेटस व्हायरल केल्याप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Organizations) पुकारलेल्या कोल्हापूर शहर बंदला (Kolhapur Protest) चांगला प्रतिसाद मिळाला. शहरातील दैनंदिन व्यवहार ठप्प आहेत. यावेळी गोंधळ निर्माण झाल्याने पोलिसांना लाठिचार्ज करावा लागला. या प्रकरणावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या गोंधळापाठिमागील बोलविता धनी कोण आहे याचा शोध घेणार असल्याचे सांगत कुठल्याही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, असा कडक इशारा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला.

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, अचानक औरंग्याच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, जाणून बुजून कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) खराब झाली पाहिजे, यासाठी तर या अवलादी पैदा झाल्या नाहित ना हे देखील तपासून बघावे लागेल. कोल्हापूरमध्ये आता परिस्थिती नियंत्रणाखाली आहे. पूर्णपणे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. कायदा कोणी हातात घेऊ नये कुठल्याही परिस्थितीत औरंग्याच्या अवलादीला सोडणार नाही, असा इशारा फडणवीस यांनी दिला.

…तर कारवाई करावीच लागेल

या ठिकाणी कधीही औरंगजेबाचे उदात्तीकरण होऊ शकणार नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा
(Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्र आहे. पण हे जे नव्याने पैदा झालेले आहेत,
त्यांचे बोलवीते धनी कोण आहेत हे ही शोधून काढावे लागले आणि आम्ही ते शोधून काढू.
मात्र महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये कायदा हातात घेतल्यामुळे एकीकडे त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न
तर निर्माण होतोच पण त्यासोबत महाराष्ट्राचा जो नावलौकिक आहे. त्याच्यावरही त्याच्यामुळे डाग लागतो, म्हणून सगळ्यांना विनंती आहे कोणीही कायदा हातात घेऊ नये, कोणीही कायदा हातात घेतला तर त्याच्यावर कारवाई करावीच लागेल, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) काय म्हणाले हे मला माहिती नाही.
पण महाराष्ट्रात औरंगजेबाच्या उदात्तीकरण होणार तर संताप निर्माण होतोच,
फक्त अशा प्रकारच्या संतापामध्ये कायदा हातात घेणे योग्य नाही, असंही फडणवीस म्हणाले.

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis first reaction on the kolhapur incident

Related Posts