IMPIMP

Devendra Fadnavis | ‘इतकी ‘बालबुद्धी’… आता बघूच शवासन कुणाला करावे लागते ते…’, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्याला फडणवीसांचे प्रत्युत्तर

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis slams uddhav thackeray over family whatsapp statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – देवेंद्रजी (Devendra Fadnavis) तुमचाही परिवार आहे. परिवारावर बोलू नका. काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट बाहेर येत आहेत. मी त्यावर बोलणार नाही. अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन (Shavasana) करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही, फक्त झोपावं लागेल, असा गर्भित इशारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना दिला होता. उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

 

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1672526376044498944?s=20

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा (BJP) परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे! ज्या ‘व्हॉटसअ‍ॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपवण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका.

मृतांच्या टाळूवरील लोणी कोणी खाल्ले

चिंता करायचीच असेल आणि पुस्तक काढायचेच असेल तर यावर काढा
➡️ सामान्य शिवसैनिकांना वार्‍यावर सोडून
मुख्यमंत्रीपद, मंत्रिपद घरात कसे ठेवले यावर… ➡️ मुंबईला कुणी लुटले यावर…
➡️ मृतांच्या टाळूवरील लोणी कोणी खाल्ले यावर… ➡️ मराठी माणसाला कुणी ओरबाडले यावर…
➡️ 100 कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे दिले जाते यावर…
तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार.
आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही.
तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या… बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…, असं फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Web Title : Devendra Fadnavis | devendra fadnavis slams uddhav thackeray over family whatsapp statement

Related Posts