IMPIMP

Devendra Fadnavis | काँग्रेस वगळून देशात आघाडी करण्याला शरद पवारांची साथ; फडणवीसांच्या दाव्याने राजकारणात खळबळ

by nagesh
NCP Chief Sharad Pawar | sharad pawar reaction on devendra fadnavis claims of morning oath with ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या एका दाव्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील वातावरण एन थंडीत तापले आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta banerjee) यांचा काँग्रेसला वगळून देशात आघाडी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

मुंबई दौऱ्यावर आलेल्या ममता बॅनर्जी यांनी काही भेटीगाठी घेतल्या. पण त्यामागचा उद्देश उद्योगांना आकृष्ट करणे हा नव्हता. दौऱ्याचा मूळ अजेंडा राजकीय होता. भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र घेऊन लढायचे, असे म्हणत असताना शरद पवार अंडरलाईन स्टेटमेंट करतात. त्यावेळी त्यांना काँग्रेस सोडून सर्व एकत्र या असे पवार यांना म्हणायचे असते. थेट बोलणाऱ्यांपैकी ममता बॅनर्जी आहेत तर शरद पवार हे नेहमीच ‘बिटवीन द लाईन’ बोलतात. म्हणजे दोघांचेही बोलणे एकच आहे. काँग्रेसला बाजूला ठेऊन दोघांना इतरांना सोबत घ्यायचे आहे. गोवा आणि पूर्वोत्तर राज्यात ममता बॅनर्जी निवडणुका लढवत आहेत. त्यामधून त्यांना सांगायचं आहे की, काँग्रेस हा विरोधी पक्ष नसून काँग्रेस आता संपली आहे. खरी काँग्रेस आम्हीच आहोत. अशी त्यांची भूमिका आहे. विशेष म्हणजे या सर्वांना पवारांचे समर्थन आहे. पवारांचे पहिल्या दिवसापासून हेच मत आहे पण राज्यात परिस्थिती अनुकूल नसल्याने काँग्रेसला सोबत घ्यावेच लागले असेही फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले.

 

ममता बॅनर्जी, संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)
यांच्या भेटीबाबत फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले, कितीही गुप्त बैठका होऊ द्या २०२४ मध्ये मोदींचेच सरकार येणार.
मी ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी देशातील अनेक राज्यातील मंत्री उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रात यायचे.
त्यामध्ये काँग्रेसचेही असायचे आम्ही त्यांचे स्वागत करायचो पण आता इथे ममता बॅनर्जी आल्या की स्वागत होते आणि अन्य भाजपशासित राज्याचा मुख्यमंत्री आल्यावर टीका केली जाते ही दुटप्पी भूमिका असल्याचे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | ncp chief sharad pawars support efforts form front excluding congress devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Pune Crime | TC चा काळा कोट अन्….. रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष, दोघी अटकेत

IND Vs NZ | टेस्ट सिरीजमध्ये तब्बल 133 वर्षानंतर इतिहासाची पुनरावृत्ती; ‘या’ अनोख्या रेकॉर्डशी केली बरोबरी

Vijay Wadettiwar | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने निर्बंध?, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

 

Related Posts