IMPIMP

Devendra Fadanvis | नाशिक पदवीधर निवडणूकीत देवेंद्र फडणवीस यांनीच केला काँग्रेसचा करेक्ट कार्यक्रम?

by nagesh
Devendra Fadnavis On Mumbai Textile Commissioner Office | No decision to shift textile commissioner's office to Delhi - Devendra Fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात रोज काही ना काही तरी घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर सध्या राज्यात विधानपरिषद निवडणुकांचे वारे वाहत आहे.( Devendra Fadanvis) त्यातच आज नाशिक पदवीधर मतदार संघात घडलेल्या घटनेने राजकीय आखाड्यात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस पक्षावर नामुष्की ओढावल्याचे बोलले जात आहे. ( Devendra Fadanvis)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यासाठीचा एबी फॉर्म देखील पक्षाकडून देण्यात आला. पण सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्जच दाखल केला नाही. त्यांच्या जागी त्यांचा मुलगा सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की, यासाठी आपण महाविकास आघाडीसोबतच भाजपचा देखील पाठिंबा मागू असे सुचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे एक वेगळीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

सुधीर तांबे यांच्या निर्णयामुळे काँग्रेस पक्षावर मोठी नामुष्की नाशिक पदवीधर मतदार संघात ओढावली आहे.सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. काही दिवसांपासून सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यात अखेरच्या क्षणापर्यंत तांबे पिता-पुत्रांनी आपला उमेदवारी अर्ज न दाखल केला नव्हता. वेळ संपण्याच्या अवघी काही मिनिटे अगोदर हे पिता-पुत्र अर्ज दाखल करण्यासाठी आले. पण नेमका फॉर्म भरणार कोण? असा सस्पेन्स शेवटच्या क्षणापर्यंत निर्माण झाला होता. फॉर्म भरल्यानंतर बाहेर येवून माध्यमांशी संवाद साधत हा सस्पेन्स या दोघांनी मिटवला.

 

तांबे पिता-पुत्रांनी घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली आहे.
पण या विषयी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या एका वक्तव्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे.
७ डिसेंबरला देवेंद्र फडणवीसांनी सत्यजीत तांबे यांच्या सिटीझनविल या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना एक सूचक वक्तव्य केले होते. त्यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी बोलल्याप्रमाणे करून दाखवले. अशी चर्चा आहे.
(Devendra Fadanvis)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब थोरातांना हसत हसत एक इशारा दिला होता.
ते म्हणाले होते की, ‘खरंतर बाळासाहेब माझी तक्रार आहे, तुम्ही किती दिवस असे नेते बाहेर ठेवणार आहात.
जास्त दिवस बाहेर ठेवू नका, आमचाही डोळा मग त्यांच्यावर जातो. चांगली माणसं जमाच करायची असतात.’
त्यानंतर उपस्थितांमध्ये प्रचंड हाशा पिकला होता.
तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर सत्यजीत तांबेंनी देखील देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्याला दुजोरा देत
एक सूचक वक्तव्य केले होते. सत्यजीत तांबे म्हणाले होते की, ‘देवेंद्र फडणवीसांना चांगल्या लोकांची पारख आहे.’
त्यामुळे वेगवेगळे तर्क वितर्क वर्तविण्यात येत होते.
त्यावर आज भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवार न दाखल केल्यामुळे यात काँग्रेसचाच बळी
देण्यात आल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

 

Web Title :- Devendra Fadnavis | set back for congress satyajit tambe filed independent nomination devendra fadnavis old statement viral

 

हे देखील वाचा :

Punit Balan Celebrity League | दुसरी ‘पुनित बालन सेलिब्रीटी लीग’ क्रिकेट स्पर्धा ! तोरणा लायन्स्, सिंहगड स्ट्रायकर्स संघांनी उद्धघाटनाचा दिवस गाजवला

Supriya Sule | मंत्रीमंडळ विस्तारावरून सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले; म्हणाल्या…

Kili Paul | प्रसिद्ध रील स्टार किली पॉलला ही रितेश देशमुखच्या ‘वेड लावलंय’ गाण्याची पडली भुरळ, Video केला शेअर

 

Related Posts