IMPIMP

Devendra Fadnavis | ‘मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Lok Sabha Election 2024 | loksabha election 2024 bjp mission 48 seat announced devendra fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | मागील अनेक दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) आणि भाजप (BJP) यांच्यात राजकीय शीतयुद्ध पाहायला मिळत आहे. त्यातच आघाडी सरकारमधील काही नेत्यांच्या मागे लागलेला ईडीचा (ED) ससेमिरा यावरुनही वातावरण पुर्ण ढवळून निघत आहे. अशातच भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठं विधान केलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

भाजप पक्ष स्थापना दिनानिमित्ताने (BJP Foundation Day) मुंबईतील (Mumbai) भाजपच्या मुख्यालयात कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”येत्या काळात मोठा संघर्ष उभा करावा लागणार आहे. दबावाला बिलकुल बळी पडू नका. मुंबईत आणि महाराष्ट्रात येत्या काळात एक नवा संघर्ष उभा करू, यांना सिंहासनावरून खाली खेचल्याशिवाय आपली लढाई ही थांबणार नाही. हाच विश्वास स्थापना दिनाच्या निमित्ताने उपस्थित करतो.”

 

 

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”माझा शिवसेनेला (Shiv Sena) सवाल आहे कि तुम्ही राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेसची (Congress) कितवी टीम आहे. आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून’. तर, आयएनएस विक्रांत किंवा असे अनेक आरोप किरीट सोमय्यांवर (Kirit Somaiya) करण्यात आले होते. मात्र कोणत्याही आरोपाबाबत पुरावे देण्यात आले नाही. पोलिसांवर देखील खूप दबाव देण्यात आला, मात्र पोलीस बोलेले अशी कारवाई करता येत नाही,” असं म्हणत फडणवीसांनी राऊतांना टोला लगावला आहे.

 

 

दरम्यान, ”पंतप्रधान मोदी जेव्हाही बोलतात तेव्हा आपल्याला ते दिशा दाखवतात. भाजपची निर्मिती ही राष्ट्रवादातून झालीय.
काश्मिरच्या मुद्यावरून मुखर्जी यांनी नेहरू मंत्री मंडळातून राजीनामा दिला होता. भाजपा हा विश्वातील मोठा पक्ष म्हणून नाव समोर आलंय.
भाजपा पक्ष संपवण्याकरीता खूप प्रयत्न करण्यात आले. अनेक नेत्यांना आणीबाणी काळात दोन-दोन वर्ष जेल मध्ये ठेवण्यात आले.
अमित शहा (Amit Shah) यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जेव्हा दोन होतो तेव्हा आम्ही घाबरलो नाही
आणि आता तीनशे आहेत तर घाबरण्याचा प्रश्नच येत नाही.” असं ते म्हणाले. तसेच ”2 संदेश मोदींनी आता दिले आहेत.
एक समतेचा आणि दुसरा म्हणजे योजना प्रत्येक नागरीकांपर्यंत पोहचली पाहिजे,” असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | we will start a new struggle in mumbai and maharashtra bjp leader devendra fadnavis decided

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील आलिशान सोसायटीत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश ! बाणेरमधील डिव्हाईन स्पावर कारवाई करुन तिघांना अटक

Pune Crime | 22 वर्षाच्या तरूणाकडून 31 वर्षीय तरूणीकडे शरीर सुखाची मागणी ! पठ्ठयानं थेट KISS घेवून केला विनयभंग; हडपसर परिसरातील घटना

Supreme Court On Compassionate Employment | ‘अनुकंपा’च्या तत्वावर विवाहित मुलीला सुद्धा नोकरीचा अधिकार, मात्र हयात पालकाची असावी संमती; जाणून घ्या सुप्रीम कोर्टाची टिप्पणी

 

Related Posts