IMPIMP

Andheri East by-Election | ऋतुजा लटके यांना शिंदे गटात पळविण्याचा प्रयत्न? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितले

by nagesh
Uday Samant | uday samant visits sangli jath 42 villages who warns to go into karnataka over water issue

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यातील वाद जून महिन्यापासून सुरु आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission of India) आणि सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) त्यासंबंधी अनेक खटले
प्रलंबित देखील आहेत. हा वाद काही काळ पुढे चालू राहीला असता, पण आयोगाला हंगामी निर्णय घेत, या वादावर तात्काळ पडदा टाकावा लागला
आहे. कारण शिवसेनेचे अंधेरी पूर्व येथील (Andheri East by-Election) आमदार रमेश लटके (MLA Ramesh Latake) यांचे निधन झाले. त्यामुळे
या मतदारसंघात पोटनिवडणुका (Andheri East by-Election) लागल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेच्या दोनही गटांनी आपला उमेदवार येथे देण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचमुळे आता निवडणूक आयोगाला दोन्ही गटांना हंगामी नावे आणि चिन्हांचे वाटप करावे लागले. महाविकास आघाडीकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना शिंदे गटात आणून उमेदवारी देण्याचे प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे.
त्यावर शिंदे यांच्या गटानचे आमदार आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्ट केली आहे.

 

अंधेरी पोटनिवडणुकीशी (Andheri East by-Election) संबंधित निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.
या बद्दल मला कोणतीच माहिती नाही. मात्र, अंधेरी पोटनिवडणुकीत जो उमेदवार उभा असेल, तो युतीचा असेल आणि तो आमच्या बहुमताने निवडून येईल, असे उदय सामंत म्हणाले.

 

 

Web Title :- Andheri East by-Election | uday samant statement on andheri east bypoll and rutuja latke candidature

 

हे देखील वाचा :

Amol Mitkari | बाळासाहेबांच्या नावाने चिन्ह मागण्यापेक्षा तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नावाने चिन्ह मागा – अमोल मिटकरी

Meenakshi Shinde | दुर्जनांचा नाश करण्यासाठी तलवार आणि सज्जनांच्या रक्षणार्थ आम्हाला ढाल मिळाली, ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल

Pune Shivsena | पुण्यातील मशालयात्रेत शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये राडा! फ्री-स्टाईल हाणामारीचा Video व्हायरल

Pune Crime | हॉर्न वाजविल्याने तरुणाच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार, कसबा पेठेतील घटना

 

Related Posts