IMPIMP

Diabetes Control Tips | डायबिटीजच्या रूग्णांनी शुगर कंट्रोल करण्यासाठी करावेत ‘हे’ 5 वर्कआऊट, जाणून घ्या

by nagesh
Diabetes Control Tips | 5 best workout for diabetes control

सरकारसत्ता ऑनलाइन – Diabetes Control Tips | मधुमेही रुग्णांनी शुगर कंट्रोल (Blood Sugar Level Control) ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवण्यास व्यायाम करणेही आवश्यक आहे. नियमित व्यायाम केल्याने रक्तातील साखरेची पातळी ठीक राहते, त्याचबरोबर अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. व्यायामामुळे हृदयाचे आरोग्यही चांगले राहते. प्री-डायबिटीज असलेल्या रुग्णांसाठी व्यायाम देखील खूप प्रभावी आहे. (Diabetes Control Tips)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मते, आठवड्यातून किमान 150 मिनिटे मध्यम ते जोरदार एरोबिक व्यायाम मधुमेह नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. व्यायामामुळे केवळ वजन नियंत्रित होत नाही तर ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रित राहते.

 

मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी फक्त व्यायामशाळेत जाऊनच वर्कआउट करणे आवश्यक नाही, हलका एरोबिक व्यायाम करून ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवता येते.

 

ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी कोणते व्यायाम करता येऊ शकतात ते जाणून घेऊया (exercises to control the blood sugar level).

 

चालण्याचा व्यायाम (Walk) :
2014 च्या पुनरावलोकनानुसार, चालणे टाइप 2 मधुमेह असलेल्या रुग्णांना ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करते. आठवड्यातून पाच दिवस 30 मिनिटे वेगाने चालून तुम्ही मधुमेहावर नियंत्रण ठेवू शकता. (Diabetes Control Tips)

 

सायकल चालवा (ride a bicycle) :
ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी सायकल चालवणे हा एक उत्तम व्यायाम आहे. सायकल चालवल्याने रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते, तसेच वजनही नियंत्रणात राहते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

स्विमिंग करा (Go Swimming) :
पोहणे हा एक एरोबिक व्यायाम आहे जो टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी प्रभावी आहे.
पोहण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि कोलेस्ट्रॉलही नियंत्रित राहते, ज्यामुळे हृदय निरोगी राहते.

 

डान्स करा (Dance) :
ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल ठेवण्यासाठी मधुमेहाचा त्रास असलेले लोक दररोज 15 मिनिटे त्यांच्या आवडीचा डान्स करू शकतात.
डान्स करण्यासाठी तुम्हाला डान्स स्टेप्स फॉलो करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणत्याही गाण्यावर डान्स करून शुगर कंट्रोल करू शकता.

 

वेट लिफ्टिंग करा (Do Weight Lifting) :
वेट लिफ्टिंगने वजनावर नियंत्रण तर राहतेच पण स्नायूही मजबूत होतात. वेट लिफ्टिंगने कॅलरी जलद बर्न करू शकता, तसेच ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करू शकता.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Control Tips | 5 best workout for diabetes control

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस-अजित पवारांमध्ये जुगलबंदी; माईक, चिठ्ठी अन्…

Diabetes च्या रूग्णांसाठी रामबाण आहे घरातील ‘हा’ मसाला, जाणून घ्या कसा करावा वापर

Headache Solution | नेहमी डोकेदुखीने होत असाल त्रस्त तर ‘या’ 5 घरगुती उपायांनी करा उपचार; जाणून घ्या

 

Related Posts