IMPIMP

Diabetes Diet | किचनमधील ‘या’ मसाल्याने डायबिटीजमध्ये मिळेल दिलासा, जाणून घ्या वापर करण्याची विशेष पद्धत

by nagesh
Diabetes Diet | clove spice for type 2 diabetes patient can control blood sugar level insulin pancreas

सरकारसत्ता ऑनलाईन टीम – डायबिटीज (Diabetes Diet) हा एक आजार आहे जो जेनेटिक कारणांमुळे होऊ शकतो, परंतु सामान्यतः तो आपली खराब जीवनशैलीमुळे आणि अनहेल्दी फूड हॅबिटमुळे होतो. केवळ भारतच नाही तर जगभरातून लोक त्याच्या कचाट्यात येत आहेत. डायबिटीजमुळे इतर अनेक आजारांचा धोकाही निर्माण होतो. येथे इन्सुलिनची महत्त्वाची भूमिका आहे, या हार्मोनच्या मदतीने ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रणात राहते. डायबिटीजमुळे (Diabetes Diet) इन्सुलिनच्या स्रावावर परिणाम होतो. शुगर मेंटेन करण्यासाठी किचनमधील कोणते पदार्थ खाऊ शकता ते जाणून घेऊया (Clove for Diabetes).

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लवंग खाल्ल्याने कंट्रोल होईल ब्लड शुगर लेव्हल
डायबिटीजच्या रुग्णांनी त्यांच्या नियमित आहारात लवंगेचा समावेश करणे आवश्यक आहे, या गरम मसाल्याचा वापर सामान्यतः जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो, परंतु कदाचित फार कमी लोकांना हे माहीत असेल की याचा वापर ब्लड शुगर लेव्हल (Blood Sugar Level) नियंत्रित करण्यासाठीदेखील केला जाऊ शकतो. शुगर मेंटेनसाठी लवंग डायबिटीज रुग्णांसाठी वरदानापेक्षा कमी नाही. कारण त्यात अँटी-डायबेटिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. या मसाल्याचा वापर शुगरच्या रुग्णांना कसा फायदा होतो ते जाणून घेऊया.

 

डायबिटीजच्या रुग्णांसाठी का फायदेशीर आहे लवंग?
लवंगमध्ये डायबिटीजविरोधी गुणधर्म असतात, म्हणूनच लवंग तेलाचे सेवन केल्याने इन्सुलिन आणि ग्लुकोजच्या रिस्पॉन्स मॅकेनिझममध्ये वाढ होते. या गरम मसाल्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट स्वादुपिंडाचे कार्य सुधारण्यास मदत करतात. स्वादुपिंड (Pancreas) हा आपल्या शरीराचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे ज्याद्वारे इन्सुलिन तयार होते. म्हणूनच जे डायबिटीज रुग्ण दररोज लवंगाचे सेवन करतात, त्यांना ब्लड शुगर लेव्हल मेंटेनची काळजी करण्याची गरज नाही. (Diabetes Diet)

 

डायबिटीज रुग्णांनी कसा करावा लवंगेचा वापर?
– यासाठी एक चमचा लवंग बारीक वाटून घ्या.
– आता ही पावडर एक कप पाण्यात टाका आणि सुमारे १० मिनिटे उकळवा.
– उकळी आल्यावर त्यात अर्धा चमचा चहा पावडर टाका आणि थोडा वेळ राहू द्या.
– आता हे पाणी गाळून घ्या आणि ते थंड होण्याची प्रतीक्षा करा.
– आता हे पाणी प्या आणि ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करा.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diabetes Diet | clove spice for type 2 diabetes patient can control blood sugar level insulin pancreas

 

हे देखील वाचा :

Nysa Devgan | न्यासा देवगणचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; नेटकरी करत आहेत ट्रोल

Weight Loss Tips | ‘या’ कडू भाजीने कमी होईल वजन, मिळेल Rakul Preet Singh सारखा फिटनेस

Zero Emission Mobility Platform (ZeMP) | संपूर्ण भारतात ईव्ही फ्लीट विस्तारासाठी झेडईएमपी ची बीगॉस ऑटो टू व्हिलर सोबत भागीदारी

 

Related Posts