IMPIMP

Diagnose Skin Diseases | स्मार्टफोनच्या मदतीने 50 हून अधिक त्वचारोगांचा शोध लागणार; त्वचा-तोंडाचा कॅन्सर शोधून काढणंही होणार सोपं

by nagesh
Diagnose Skin Diseases | artificial intelligence driven smartphone app dermaaid to diagnose skin diseases and cancer

सरकारसत्ता ऑनलाइन – Diagnose Skin Diseases | जगभरातील एकूण मृत्यूंपैकी सुमारे २% मृत्यू त्वचेच्या आजारांशी संबंधित आहेत. या समस्या वेळीच ओळखल्या गेल्या तर त्याची तीव्रता आणि जीवघेण्या परिस्थितीचा धोका कमी होऊ शकतो (Diagnose Skin Diseases). तथापि, भारतात बहुतेक रुग्णांमध्ये, त्वचेशी संबंधित समस्यांचे वेळेत निदान होत नाही ज्यामुळे ही समस्या वाढते आहे (Artificial Intelligence Driven Smartphone App Dermaaid To Diagnose Skin Diseases And Cancer).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या बाबी लक्षात घेऊन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) एक मोबाइल अ‍ॅप्लिकेशन सुरू केले असून, त्याच्या मदतीने त्वचेशी संबंधित आजार, अगदी तोंडाच्या त्वचेच्या कर्करोगाचे (Cancer) निदानही सहज होऊ शकते.

 

एम्स-दिल्ली आणि स्टार्ट अप न्यूट्रिशन लॅब यांनी संयुक्तपणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने त्वचारोगांची वेळीच ओळख पटवून त्यावर उपचार करण्यात मदत करता येणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ञांचा असा दावा आहे की डॉक्टरांसाठी हा अनुप्रयोग त्वचेची स्थिती सहजपणे समजण्यास उपयुक्त ठरू शकतो. या अ‍ॅपविषयी सविस्तर जाणून घेऊयात (Diagnose Skin Diseases).

 

डर्मेड (Dermed) :
डर्मेड नावाचे हे अ‍ॅप मशीन-लर्निंग एआय-पॉवर्ड अल्गोरिदमचा वापर करून त्वचेच्या समस्या ओळखू शकते. याच्या माध्यमातून त्वचा आणि तोंडाच्या कर्करोगासह त्वचेशी संबंधित अनेक आजार सहज शोधता येतात. त्याची अचूकता प्राथमिक अभ्यासात ८० टक्क्यांपर्यंत असल्याचे दिसून आले आहे, असे एम्समधील व्हेनॉलॉजी अँड त्वचाविज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ. सोमेश गुप्ता (Dr. Somesh Gupta) यांनी सांगितले. त्वचारोगांच्या निदानात त्याची महत्त्वाची भूमिका असू शकते.

 

अ‍ॅप कसे काम करणार (How The App Works) ? :
मोबाइल अ‍ॅपबाबत शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, त्याचा वापर अगदी सोपा आणि प्रभावी होऊ शकतो. त्वचेची स्थिती आणि आजारांची माहिती होण्यासाठी डॉक्टरला रुग्णाच्या शरीरावरील जखमा किंवा त्वचाविकारांचे छायाचित्र काढून क्लाउड सर्व्हरवर अपलोड करावे लागेल. अपलोड केल्यानंतर १५-३० सेकंदाच्या आत हे अ‍ॅप मशीन अ‍ॅनालिसिसवर आधारित फोटो देईल, ज्याच्या आधारे समस्या ओळखता येईल. फंगल इन्फेक्शनपासून ते एक्झामा आणि स्किन कॅन्सरपर्यंतच्या समस्या या अ‍ॅपच्या मदतीने सहज कळू शकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्वचेचा कॅन्सरही कळू शकतो (Skin Cancer Can Also Be Detected) :
डर्मेड अ‍ॅपबद्दल माहिती देताना डॉ. सोमेश गुप्ता सांगतात, आतापर्यंत या अ‍ॅपमुळे ५० हून अधिक त्वचारोग सहज ओळखता येतात. या वर्षाअखेरपर्यंत त्यात अपडेशन करून आजार ओळखण्याची क्षमता वाढविण्याचे काम केले जात आहे. सुमारे ८० टक्के अचूकतेसह मेलेनोमासह मुरुम, सोरायसिस, व्हिटिलिगो, टिनिया, एक्झामा, बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस सेल कार्सिनोमा यासारखे कर्करोग ओळखण्यास हे अ‍ॅप प्रभावी ठरले आहे, अशीही डॉ. गुप्ता यांनी माहिती दिली.

 

मोबाइलवरून कळणार त्वचारोग (Dermatology Will Known From Mobile) :
देशात त्वचारोगतज्ज्ञांची कमतरता आहे, असे सांगून डॉ. सोमेश म्हणतात
की, छोट्या शहरांमधील तज्ज्ञांना सहज उपलब्ध नसल्याने लोकांना त्वचारोग ओळखणे थोडे कठीण होऊन बसते.
अशा परिस्थितीत या अ‍ॅपकडे मोठं यश म्हणून पाहिलं जात आहे.

विशेषत: ग्रामीण भारतात, जिथे त्वचारोगतज्ज्ञ सहज उपलब्ध होत नाहीत,
अशा ठिकाणी हे अ‍ॅप लोकांना त्यांच्या मोठ्या अडचणींचे सहज निदान करण्यास मदत करेल.
तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण वाढत असल्याने या समस्या सहज ओळखून परिस्थितीबाबत स्पष्टीकरण देण्यासाठीही या अ‍ॅपमुळे मदत होणार आहे.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Diagnose Skin Diseases | artificial intelligence driven smartphone app dermaaid to diagnose skin diseases and cancer

 

हे देखील वाचा :

Modi Government On Layer’r Shot Ads | मोदी सरकारचा युट्युब-ट्विटरला दणका, लैंगिक हिंसेला प्रोत्साहन देणारी ‘ती’ जाहिरात काढण्याचे आदेश

National Pension Scheme (NPS) | दरवर्षी रू. 2 लाखपर्यंत गुंतवणुकीवर वाचू शकतो टॅक्स, निवृत्तीनंतर येणार नाही आर्थिक तंगी !

Sangali Crime | पिंपरी-चिंचवडहून जयसिंगपूरला निघालेल्या कुटुंबाच्या कारचा भीषण अपघात, 5 जणांचा जागीच मृत्यू

 

Related Posts